केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण, बेसिक सॅलरी वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : हे चालू वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहे. खरे तर गेल्या वर्षी सदर नोकरदार मंडळीला आठ टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली होती. यावर्षीही त्यांना जानेवारीपासून 50 टक्के महागाई भत्ता दिला जाणार असा दावा होत आहे.

जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमधील एआयसीपीआय निर्देशांक समोर आले असल्याने यावरून याबाबतचा दावा केला जात आहे.

दरम्यान जर या ही वेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून त्याची घोषणा होण्यास अजून बराच वेळ आहे.

मार्च महिन्यात याबाबतची घोषणा होणार असे बोलले जात आहे. अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढणारचं आहे, पण आता त्यांच्या मूळ पगारात सुद्धा वाढ होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढवणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा आहे. मात्र यामध्ये 3.68 पट पर्यंत वाढ होणार अशी शक्यता आहे. याबाबत विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा देखील केला जात आहे.

दरम्यान हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होईल आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून फिटमेंट फॅक्टर वाढवला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे. तसेच यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18,000 वरून वाढून थेट 26,000 एवढा होणार आहे. यामुळे केंद्र शासन याबाबतचा निर्णय केव्हा घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

Leave a Comment