आता घरबसल्या बदलता येणार पॅन कार्ड वरील नाव ! कशी आहे प्रोसेस ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card News : पॅनकार्ड हे वित्तीय कामकाजांसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र आधार कार्ड प्रमाणेच उपयोगाच आहे. हे जवळपास सर्वच वित्तीय कामांसाठी उपयोगी पडते. बँकेत खाते खोलण्यासाठी, आयटीआय भरण्यासाठी, KYC साठी सर्वच ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक असते.

मात्र अनेकांकडे असलेल्या या महत्त्वाच्या कागदपत्रात चुका झाल्याचे आढळून आले आहे. पॅन कार्ड मध्ये अनेकांच्या नावात मिस्टेक झाली आहे. त्यामुळे पॅन कार्ड मध्ये नाव कसे दुरुस्त करावे, तसेच पॅन कार्ड मधील नावात बदल कसा करावा हा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान आता आपण पॅन कार्ड मधील नाव कसे बदलले जाऊ शकते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे पॅन कार्ड मधील नाव दुरुस्त करण्यासाठी आता कोणत्या शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. घरबसल्या ऑनलाईन पॅन कार्ड मधील नाव दुरुस्त केले जाऊ शकते. आता आपण पॅन कार्ड मधील बदलण्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत.

कशी आहे प्रोसेस ?

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर मग ऑनलाईन सेवा या टॅब वर क्लिक करावे लागेल.
यानंतर मग तिथे असलेल्या पॅन कार्ड पुनमुद्रण/दुरुस्ती/ पत्त्यात बदलाची विनंती या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर ऑनलाईन अर्ज हा पर्याय निवडावा लागेल. तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग टाईप करा.
त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल. येथे तुम्हाला काळजीपूर्वक नाव टाईप करायचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पॅन कार्ड वरील नाव चेंज करू शकणार आहात.

Leave a Comment