Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अर्थातच शुक्रवारी देशभरातील राम भक्तांसाठी एक मोठे गिफ्ट दिली आहे. काल पीएम मोदी यांच्या हस्ते गोरखपूर-लखनऊ या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली.
ही ट्रेन सुरू झाल्यामुळे आता रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुसाट होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जानेवारी 2024 मध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी उभारले जात असलेले भव्य मंदिर भाविक भक्तांसाठी खुले होणार आहे.
जानेवारी महिन्यात अयोध्येतील श्रीराम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे मंदिर रामभक्तांसाठी खुले केले जाणार आहे. दरम्यान राम भक्तांना अयोध्येला सहजतेने पोहोचता यावे यासाठी गोरखपूर ते लखनऊ या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे.
काल या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दरम्यान आज आपण या गाडीच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार, गोरखपूर ते लखनऊ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रविवारपासून नियमित धावणार आहे. ही ट्रेन 22549 वंदे भारत एक्सप्रेस गोरखपूर येथून सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि बस्ती येथे सकाळी 6.58 वाजता पोहचेल, येथून मग ही गाडी अयोध्या येथे सकाळी 8.15 वाजता पोहचेल मग लखनौला सकाळी 10.20 वाजता पोहोचेल.
ही गाडी वापसीत लखनौहून संध्याकाळी ७.१५ वाजता सुटणार आहे. ही ट्रेन वापसीत अयोध्येला रात्री 9.15 वाजता पोहचणार आहे. तसेच बस्तीला 10.30 वाजता आणि गोरखपूरला रात्री 11.25 वाजता पोहोचणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. निश्चितच या गाडीमुळे अयोध्याला दर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.