Vande Bharat Train News : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एका नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे चित्र तयार झाले आहे. खरे तर, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लॉन्च झाली आहे तेव्हापासूनच या ट्रेनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
ही गाडी 2019 मध्ये लॉन्च झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की, मुंबई ते कोल्हापूर दरम्यान आणि पुणे ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. याशिवाय, आता नागपूरलाही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे नुकताच एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची मोठी मागणी उपस्थित करण्यात आली आहे.
अर्थातच या प्रस्तावावर जर सकारात्मक निर्णय घेतला गेला तर नागपूरला येत्या काही महिन्यांनी तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर यानंतर आता नागपूर ते सिकंदराबाद यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे दिसत आहे.
तथापि रेल्वे बोर्ड यावर काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दुसरीकडे जर नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा दाखवला गेला तर नागपूरला पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे.
यावर जर लवकर निर्णय घेतला गेला तर कदाचित देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन या मार्गावर धावताना दिसणार आहे. कारण की वंदे भारत स्लीपर ट्रेन अजून लॉन्च झालेली नाही.
पण ही गाडी पुढल्या महिन्यात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. लॉन्च झाल्यानंतर ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असल्याचा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मात्र मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे नागपूर ते पुणे या दरम्यान वंदे भारतचे स्लीपर व्हर्जन चालवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला असल्याने जर हा प्रस्ताव लवकरच मान्य झाला तर देशातील पहिली स्लीपर वर्जन गाडी या मार्गावर धावणार आहे.