Vande Bharat Train : मराठवाड्याला गेल्या महिन्यात वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
त्यामुळे आता या गाडींची महाराष्ट्रातील एकूण संख्या 7 वर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई ते जालना, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता मराठवाड्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मराठवाड्याला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार अशी आशा आहे.
मराठवाड्यातील लातूर शहराला मिळणार वंदे भारतची भेट
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई-जालना नंतर आता मराठवाड्याला दुसऱ्या एका वंदे भारतची भेट मिळणार आहे. मराठवाड्यातील लातूर ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
खरंतर लातूर ते मुंबई आणि मुंबई ते लातूर असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. यामुळे या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे.
दरम्यान नागरिकांच्या याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वेने सकारात्मकता दाखवली आहे.
यामुळे या नवीन वर्षात या मार्गावर देखील ही हायस्पीड ट्रेन सुरू होऊ शकते अशी शक्यता आहे. जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर निश्चितच मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास यानिमित्ताने आणखी जलद होणार आहे.