Vande Bharat Train : महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे येथील नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या तिन्ही शहरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर ही गाडी टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाचा मार्गांवर सुरू झाली.
सध्या ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. विशेष बाब अशी की, आगामी काळात महाराष्ट्राला तब्बल तीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
सध्या राज्यातील मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे.
दरम्यान, आगामी काळात मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते सिकंदराबाद आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाऊ शकते असा दावा होऊ लागला आहे.
यातील मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे या मार्गावर सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. जर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला तर नागपूर ते सिकंदराबाद यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकणार आहे.
पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सध्या स्थितीला शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. मात्र, भविष्यात या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाईल असे बोलले जात आहे. आधी या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार असा दावा होत होता.
मात्र, आता वंदे भारत स्लीपर ट्रेन ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. निश्चितच, जर या तीन मार्गांवर ही गाडी सुरू झाली तर या संबंधित मार्गाने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.