Viral News : मेंढीचे एक कोकरू कितीला विकले जाते? 4 हजार, 5 हजार जास्तीत जास्त 10 हजार यापुढे मेंढीच्या कोकरुला किंमत मिळत नाही. मात्र राजस्थानमध्ये अशी एक घटना घडली आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राजस्थानमध्ये एका मेंढीच्या कोंकराला तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली आहे.
यामुळे नेमके या मेंढीच्या कोकरूमध्ये असे काय खास होते ज्यामुळे याला एवढी विक्रमी बोली लागली याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून आहे. दरम्यान आज आपण याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
असं सांगतात की, पैसा हा सर्वस्वी आहे. पैशासाठी माणूस काहीही करू शकतो. याची अनेक उदाहरणे देखील आपल्याला ऐकायला मिळतात. पैशांसाठी नातेसंबंध सर्व विसरून लोक कोणत्याही पातळीला पोहोचतात. परंतु, राजस्थानमध्ये याउलट घडले आहे. राजस्थान मधील चुरु जिल्ह्यातील एका मेंढपाळाला त्याच्या मेंढीच्या कोकरूच्या बदल्यात एक कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती.
पण एवढी विक्रमी बोली लागलेली असतानाही या मेंढपाळाने या कोकरूला विकण्यास नकार दिला. यामुळे पैसा हे सर्वस्वी जरी वाटत असले तरी देखील आजही असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पुढे पैसा हा शुल्लकच आहे, असे बोलले जात आहे.
एक कोटी रुपयाची बोली लागण्याचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, चुरु जिल्ह्यातील तारानगर येथील मेंढपाळ राजू सिंग यांच्या मेंढीच्या कोकरूला एक कोटी रुपयांची बोली लागली आहे. याचे कारण म्हणजे या कोकरूच्या अंगावर 786 हा नंबर होता. खरंतर 786 हा नंबर इस्लाम मध्ये खूपच पवित्र मानला जातो. मुस्लिम बंधू याला ‘बिस्मिल्ला इर-रहमान इर-रहीम’ च्या जागी वापरतात.
हेच कारण आहे की, या कोकरूला एवढी विक्रमी बोली लागली. मात्र, राजस्थान मधील या मेंढपाळाने एवढी विक्रमी बोली लागलेली असतानाही हे कोकरू विकण्यास नकार दिला. राजूने सांगितले की, त्याचे या कोकरूवर खूप प्रेम आहे. राजू म्हणाला, हे कोकरू गेल्या वर्षी जन्माला आले आहे आणि आज लोक त्यासाठी लाखो रुपयांची बोली लावत आहेत.
लोक त्यासाठी 70 लाखांपेक्षा जास्त पैसे देत आहेत, पण त्यांना हे कोकरू विकायचे नाहीये. त्यांनी या कोकरूला अगदी पोटी जन्मलेल्या मुलाप्रमाणे जीव लावला आहे. यामुळे त्यांना हे कोकरू त्यांच्यापासून दूर करायचे नाहीये. निश्चितच, पैसा हे सर्वस्वी असले तरी देखील पैशाने प्रेम खरेदी करता येत नाही आणि हे याचे एक जिवंत उदाहरण आहे. यामुळे सध्या राजस्थान मधील हे कोकरू आणि मेंढपाळ राजू सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.