काय सांगता ! जगातील सर्वात मोठे क्रुज शिप आहे 1200 फूट लांब ! एकावेळी तब्बल 7960 प्रवासी करू शकतात प्रवास, कसा राहणार या शिपचा प्रवास ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Worlds Largest Cruise Ship : असं म्हणतात की हौसेला काही मोल नसते. हौस पूर्ण करण्यासाठी अनेकजण वाटेल ते करतात. अनेकांना फिरण्याची हौस असते, अनेकांना महागड्या वस्तू खरेदी करण्याची हौस असते. तर अनेकांना संपूर्ण जग फिरण्याची हौस असते आणि जगातील नयनरम्य गोष्टी आपल्या नजरेत कैद करायचा असतात.

अनेकांना सागरी जहाजावर प्रवास करायचा असतो. यासाठी लोक लाखो करोडो रुपयांचा खर्च करतात. दरम्यान जगातील सर्वात मोठे क्रूज शिप अशा हौशी लोकांसाठी लवकरच सुरु होणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रूज शिप आयकॉन ऑफ द सीज या नावाने ओळखले जाणार आहे.

आयकॉन ऑफ द सीज मराठीत याचा अर्थ होतो समुद्राचे प्रतीक आणि या क्रुझ शिपच्या विशेषता पाहिल्या तर हे निश्चितच समुद्राचे प्रतीकच भासत आहे. दरम्यान आज आपण या जगातील सर्वात मोठ्या क्रुझ शिपच्या विशेषता जाणून घेणार आहोत तसेच हे शिप केव्हा सुरू होणार? याबाबत देखील आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे जगातील सर्वात मोठे क्रूज शिप ? 

हाती आलेल्या माहितीनुसार, रॉयल कॅरिबियनने जगातील सर्वात मोठे क्रूज शिप तयार केले आहे. हे 1200 फूट लांब आहे. या शीप मध्ये तब्बल 7960 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामध्ये 5610 पॅसेंजर प्रवास करतील तर उर्वरित जहाजाचे स्टाफ, सदस्य राहणार आहेत. या क्रूझ जहाजात सर्वात मोठ वॉटरपार्क तयार करण्यात आले आहे. या वॉटरपार्कमध्ये 6 वॉटरस्लाईड बसवण्यात आल्या आहेत.

या जहाजावरील लोकांना असा अनुभव मिळेल ज्याचा त्यांनी कधीही विचार केला नसेल असा दावा रॉयल कॅरिबियनने केला आहे. आयकॉन ऑफ द सीजचा प्रवास मियामी येथून सुरु होणार आहे. प्रवासी येथून या शिपवर प्रवास सुरू करू शकणार आहेत. या नंतर हे जहाज इस्टर आणि वेस्टर्न कॅरिबियनमधून जाणार आहे. या दरम्यान प्रवाशी या क्रूझ जहाजावर सात रात्री मुक्काम करू शकणार आहेत.

या क्रूझ शिपवर 28 प्रकाराचे केबिन आहेत. या शिपमधील एका रूममध्ये तीन चे चार लोक राहू शकतात. रिसॉर्ट गेटवे, थीम पार्क, बीच, मद्यपान, जेवणाच्या अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. शांततेत आराम करण्यासाठी 7 पूल आणि 9 व्हर्लपूल देखील राहणार आहेत. याशिवाय, एक स्विम-अप बार, कुटुंबांसाठी एक्वा पार्क, आर्केड, जहाजावर लाइव्ह शो देखील राहणार आहेत. एकंदरीत हे जगातील सर्वात मोठे क्रुज शिप खूपच लक्झरीयस राहणार आहे.

केव्हा सुरु होणार?

या क्रुज शिपची बांधणी 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. हे क्रुज शिप आता तयार झाले आहे. त्यामुळे हे शिप केव्हा सुरू होणार? हा प्रश्न लोकांना पडला आहे. आता याबाबत महत्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज 2024 मध्ये पहिल्यांदा यात्रेसाठी रवाना होणार आहे. नुकतेच 22 जून 2023 रोजी म्हणजेच आठ दिवसांपूर्वी या जहाजाची ट्रायल पूर्ण करण्यात आली आहे.

या जहाजाच्या फिनलंडमध्ये चाचण्या झाल्या आहेत. 450 तज्ञांनी याची चाचणी घेतली आहे. प्राथमिक चाचण्यांनंतरच हे जहाज मेयर तुर्कू शिपयार्डवर परत आले आहे. यामुळे आता पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये हे जहाज प्रवासासाठी रवाना होणार असे सांगितले जात आहे.

या जहाजाचा जानेवारी 2024 मध्ये पहिला प्रवास सुरू होणार आहे. जानेवारी मध्ये होणाऱ्या पहिल्या यात्रेसाठी, फेरीसाठी सर्व तिकीट विकली गेली आहेत. फेब्रुवारीमध्ये या जहाजाची दुसरी यात्रा सुरू होणार आहे. निश्चितच, हे जहाज सर्व अपडेटेड सोयी सुविधांनी युक्त असून या शिपने प्रवास करणे चित्त थरारक अनुभव देणारे ठरणार आहे.

Leave a Comment