नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? वाचा सविस्तर प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter Id Card New Application : भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे संकेतचं दिले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

निवडणुकांमध्ये आपलाच गुलाल उधळला पाहिजे यासाठी विविध पॉलिटिकल पार्ट्या आतापासूनचं मोर्चे बांधणीच्या कामाला लागल्या आहेत. पुढील वर्षी फक्त लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असे नाही तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाचणार आहे.

याशिवाय या चालू महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी वोटिंग होणार आहे. त्या ठिकाणी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे आपल्या राज्यासह संपूर्ण देशात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी पुन्हा एकदा इलेक्शनमध्ये आपल्यालाचं विजयी करावे यासाठी सत्ता पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत तर विपक्ष देखील सत्ताप्राप्तीसाठी मतदार राजाला खुश करू पाहत आहे.

विपक्ष नागरिकांसाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहे. खरेतर निवडणुकीत मतदान करणे हा देशातील सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पण मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतात अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक मतदान कार्ड साठी अर्ज करू शकतात. म्हणजेच आपल्या देशात वोटिंग करण्यासाठी 18 वर्ष वय लागते. दरम्यान आज आपण नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

कसा करणार मतदान कार्डसाठी अर्ज ?

जर तुम्हाला वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर गूगल मध्ये जायचे आहे.

येथे गेल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला गुगलच्या सर्च बार मध्ये एन व्ही एस पी असे सर्च करायचे आहे.  किंवा तुम्ही https://voters.eci.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता. 

यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होमपेजवर FORMS अस लिहलेलं दिसेल आणि त्याखाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील.

तुम्हाला या ऑप्शन्समधून पहिल्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हा ऑप्शन आहे नवीन मतदार नोंदणीचा. New registration for general electors असा हा ऑप्शन असेल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

येथे तुम्हाला फॉर्म-6 डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. 

तुम्हाला तुमची माहिती फॉर्म-6 मध्ये भरून सबमिट करावी लागणार आहे. 

यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर एक लिंक येईल. या ई-मेल आयडीवर मिळालेल्या लिंकच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सहज तपासू शकता.

साधारण आठवडाभरात मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचणार आहे.

Leave a Comment