Voter Id Card News : 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता निवडणुक आयोग लवकरच 18 व्या लोकसभेच्या तारखा जाहीर करणार आहे. अशा परिस्थितीत, सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीला लागले आहेत.
दरम्यान अशा या राजकीय वातावरणात आज आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण घरबसल्या मतदान कार्ड साठी अर्ज कसा करता येऊ शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खर तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदार यादीत नाव असणे आवश्यक राहणार आहे. ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल, त्यांना आता मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
मात्र यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करावी लागणार आहे आणि नवीन मतदान कार्ड तयार करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण नवीन मतदान कार्डसाठी अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष म्हणजे आज आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्डसाठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
घरबसल्या मतदान कार्ड साठी अर्ज करण्याची प्रोसेस
आज आपण घरबसल्या नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करण्याची प्रोसेस एकूण 7 स्टेप मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- जर तुम्ही नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला Voters Service Portal च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे. तुम्हाला https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला होमपेजच्या वरच्या उजव्या कोपर्यात ‘साइन अप’ वर क्लिक करावे लागेल.
- ‘साइन अप’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. येथे तुम्हाला काही महत्त्वाचे तपशील म्हणजे माहिती भरावी लागेल आणि पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की पुन्हा एकदा तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे. मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा आणि OTP टाकून लॉगिन करावे लागणार आहे.
- आता तुमच्या समोर ‘Fill Form 6’ दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला New Registration for General Electors वर क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला Form 6 मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. शिवाय काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे.
- फॉर्म 6 काळजीपूर्वक भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज सबमिट करावा लागणार आहे.