Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात पेरले जाणारे एक मुख्य पीक आहे. राज्यातील हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आपल्या राज्यातही गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गव्हाचे पीक घेतले जात आहे. पण अलीकडील काही वर्षात गहू उत्पादनात मोठी घट आली आहे.
या पिकाचे एकरी उत्पादन कमी झाले आहे. तांबेरा रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि विविध कीटकांचा, अळीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे पिकाच्या उत्पादनात घट आली आहे. अशा परिस्थितीत या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आणि पिकाच्या चांगल्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
दरम्यान आज आपण गव्हाच्या टॉप पाच जाती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हेक्टरी 80 क्विंटल पर्यंत उत्पादनक्षम असलेल्या गव्हाच्या काही प्रमुख जातीची माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. खरतर देशातील शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवता यावे यासाठी श्रीराम फर्टिलायझर्स अँड केमिकल्सने श्रीराम कृषी संशोधन केंद्र SARC पंजाब येथे गव्हाचे विविध वाण विकसित केले आहेत. आज आपण याच वाणाविषयी माहिती पाहणार आहोत.
श्री राम सुपर 272 : गव्हाची ही एक सुधारित जात आहे. ही जात पिवळा तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जात आहे. या जातीपासून सरासरी 75 क्विंटल प्रत्येक हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळते. या जातीचे पीक 105 ते 110 दिवसात परिपक्व होते. या जातीचे दाणे मोठे, सोनेरी, चमकदार आणि कडक असतात. ही जात राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी योग्य मानली जात आहे. तथापि आपल्या राज्यातही काही शेतकऱ्यांनी या वाणाची पेरणी केली आहे.
श्री राम सुपर 303 : हा वाण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीची ज्या ठिकाणी गव्हाची पेरणी होते अशा भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. या जातीचे पीक सरासरी 105 ते 110 दिवसात परिपक्व होत आहे. या जातीपासून सरासरी 75 आणि कमाल 80 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळत आहे. ही जात काळा तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
श्री राम सुपर 231 : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. ही जात मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जात आहे. हा वाण तपकिरी तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. या जातीपासून 27 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
श्री राम सुपर 252 : गव्हाचा हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लवकर आणि उशिरा पेरणीसाठी हा वाण उपयुक्त आहे. या जातीचे दाणे मोठे, सोनेरी, चमकदार आणि कडक असतात. या जातीच्या एका झाडाला १७-२० लोब्या लागतात व एका लोम्बीमध्ये ८०-८५ दाणे येतात. या जातीच्या गावापासून 25 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी केला आहे.
श्री राम सुपर 111 : गव्हाचा हा वाण आगात आणि पसात पेरणी साठी उपयुक्त आहे. या जातीचे पीक मात्र 105 दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा केला जातो. खरे तर गव्हाचे पीक 115 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होत असते. पण श्रीराम कंपनीचे वाण फक्त 105 ते 110 दिवसातच तयार होते. विशेष म्हणजे श्रीराम कंपनीच्या या गव्हापासून हेक्टरी 80 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.