Wheat Variety : यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने राज्यातील बहुतांशी भागात पाणी संकट तयार झाले आहे. विशेषता खानदेश आणि मराठवाडा या दोन विभागात पाणी संकट आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
खरंतर या चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध भागात चांगल्या जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. मात्र अनेक भागात अजूनही समाधानकारक आणि पुढील हंगामासाठी पुरेल असा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला असला तरी देखील काही भागातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षतच पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणी सुरु होणार आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करतात. यामध्ये गव्हाचा देखील समावेश होतो. गव्हाची शेती आपल्या राज्यातही केली जाते. गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची लागवड देशातील पंजाब, हरियाणा, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातही कमी अधिक प्रमाणात या पिकाची पेरणी होते. खरंतर, गहू हे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकापासून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर सुधारित जातींची पेरणी करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे ?
करण वंदना : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. या वाणाची लागवड देशातील अनेक महत्त्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये पाहायला मिळते. हा वाण 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आला असून तेव्हापासून या वाणाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.
हा वाण पेरणी केल्यापासून चार महिन्यांच्या काळात परिपक्व बनतो. अर्थातच 120 दिवसांमध्ये हा वाण परिपूर्ण काढण्यासाठी तयार होतो. या जातीपासून सरासरी 65 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
लोकवण : हा देखील गव्हाचा एक लोकप्रिय वाण आहे. शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष प्रसिद्ध आहे. परंतु काही राज्यांमध्ये या वाणाच्या लागवडीस प्रतिबंध आहे. कारण की हा वाण ब्लॅक स्पॉट या रोगासाठी सहनशील नाही.
या वानात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तथापि काही राज्यांमध्ये या वाणाची मोठ्या प्रमाणात शेती होत आहे. हा एक मध्यम कालावधीत परिपक्व होणारा वाण आहे. सरासरी 100 दिवसात हा वाण परिपक्व बनतो. हेक्टरी 40 ते 45 क्विंटल एवढे उत्पादन या जातीपासून मिळवता येते.
WH 147 : या जातींचे गव्हाचे दाणे हे टपोरे असतात. दाण्यांचे वजनही अधिक असते. या जातीचा गहू चपातीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. या जातीचा गहू पेरणीनंतर साधारणतः 125 ते 130 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. अर्थातच या जातीचा परिपक्व कालावधी हा इतर जातींच्या तुलनेत थोडासा अधिक आहे.
HI 1620 : गव्हाचा हा एक दीर्घ कालावधीमध्ये परिपक्व होणारा सर्वोत्कृष्ट वाण आहे. या जातीचे पीक 125 ते 140 दिवसात परिपक्व बनते. ही जात 2019 मध्ये विकसित करण्यात आली आहे. याची लागवड मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. या जातीच्या गव्हाच्या 1000 दाण्यांचे वजन ४० ते ४५ ग्रॅम पर्यंत भरते.