Who Own The Most Land In India : भारतात जमिनीला खूप मागणी आहे. देशात एग्रीकल्चरल लँड आणि नॉन अग्रिकल्चरल लँड अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीला मोठी मागणी आहे. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळत आहे. यामुळे याला काळे सोने म्हणून ओळखतात. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे.
मात्र असे असले तरी आपल्या देशाची वाढती लोकसंख्या पाहता सध्या उपलब्ध असलेली जमीन कमी वाटू लागली आहे. हिंदुस्थानातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने अलीकडे आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसू लागली आहे.
अर्थातच कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. पाच एकरापेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
मात्र दहा-वीस एकर जमीन असणारे शेतकरी फारच कमी आहेत. निश्चितच काही शेतकऱ्यांकडे अन शेतकरी कुटुंबाकडे याहीपेक्षा अधिक जमीन आहे. पण अशा शेतकऱ्यांची संख्या ही मोजकीच आहे.
पण तुम्हाला भारतात सर्वाधिक जमीन कोणाच्या नावावर आहे याविषयी माहिती आहे का ? भारतात हजारो एकर जमीन नावावर असणारा व्यक्ती कोण आहे ? भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतात.
दरम्यान, आज आपण भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतातील सर्वात मोठा जमीनदार अखेर कोण आहे
GLIS या संस्थेने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या संस्थेने जमिनी बाबतची आकडेवारी जाहीर केली असून यामध्ये हिंदुस्थानात सर्वात जास्त जमीन ही भारत सरकारकडे असल्याचे म्हटले गेले आहे.
गव्हर्मेंट ऑफ इंडिया अर्थातच भारत सरकार हे भारतातील सर्वात मोठे जमीनदार ठरले आहेत. भारत सरकारकडे जेवढी जमीन आहे तेवढ्या जमिनीत एखादा देश बसू शकतो.
GOI म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे तब्बल 15 हजार 531 चौरस किलोमीटर एवढी जमीन असल्याची नोंद शासन दरबारी आहे.
सरकारच्या मालकीच्या जमिनीवर पब्लिक सेक्टर मधील कंपन्या, मंत्रालय आणि इतर सार्वजनिक कामकाज सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही जमीन वन विभागाकडे देखील आहे.