Who Own The Most Land In India : गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण इत्यादी पार्श्वभूमीवर जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमीन सोन्यापेक्षा महाग झाली आहे. विशेष म्हणजे जमिनीची उपलब्धता कमी होत असल्याने अनेकदा हाती पैसा असला तरी देखील जमीन खरेदी करता येत नाही. आगामी काळात देखील जमिनीचे भाव असेच चढे राहण्याची शक्यता आहे.
यामुळे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणारे बहुतांशी लोक जमीन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. शेतजमीन, NA प्लॉट मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. आपल्याकडे फार पूर्वीपासूनच जमिनीला महत्त्व आहे.
अलीकडील काही काळात तर जमिनीला अधिक महत्त्व आले आहे. ज्याच्याकडे जास्ती जमीन तो खऱ्या अर्थाने सधन आणि श्रीमंत समजला जातो. जमिनीला काळ सोन म्हणून ओळखतात. भविष्यात लोकांकडे पैसा राहील मात्र जमीन राहणार नाही, असे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत भारतात सर्वाधिक जमीन कोणाच्या नावावर आहे? हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतात सर्वात जास्त जमिनीचा मालक कोण आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
सर्वात जास्त जमीन कोणाच्या नावावर आहे
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या देशाचे एकूण क्षेत्रफळ 32,87,267 चौरस किलोमीटर आहे. देशाची लोकसंख्या ही जवळपास 150 कोटी पर्यंत पोहोचली असावी असा अंदाज आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 125 कोटी लोक राहत आहेत.
पण, यापैकी सर्वात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का. हो मग आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. GLIS या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वात जास्त जमीन गव्हर्मेंट ऑफ इंडिया अर्थातच भारत सरकारकडे आहे.
गव्हर्मेंट ऑफ इंडिया देशात सर्वाधिक जमिनीचे मालक आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडे तब्बल पंधरा हजार 531 चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या मालकीच्या जमिनीवर पब्लिक सेक्टर मधील कंपन्या, मंत्रालय आणि इतर सार्वजनिक कामकाज सुरु आहे.
या जमिनीवर 116 पब्लिक सेक्टर कंपन्या, 51 मंत्रालय आणि इतर जमिनीवर सार्वजनिक कामकाज सुरू आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया नंतर कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया या संस्थेकडे सर्वाधिक जमीन आहे.
कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हजारो शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय चालवत आहे. सर्वाधिक जमिनीच्या बाबतीत कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हे दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्डाचे नाव येते. मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाची संपूर्ण देशात जमीन आहे.
देशात हजारो मशिदी, मदरसे आणि दफनभूमी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून चालवले जात आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, वक्फ बोर्डाकडे किमान 6 लाखांहून अधिक जागेवर मालमत्ता आहेत. या संस्थेला मुस्लिम राजवटीत बहुतांश जमीन आणि मालमत्ता मिळाली आहे.