Women Property News : भारतात पूर्वापार पुरुष प्रधान संस्कृती असल्याचे आढळते. मात्र आता पुरुषप्रधान संस्कृतीला तडा गेला आहे. महिलांनी प्रत्येकच क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून देखील महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
शासनाकडून होत असलेल्या या शर्तीच्या प्रयत्नांमुळे आता महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचे दिसत आहे. महिलांसाठी आणि मुलींसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तथा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे खऱ्या अर्थाने महिलांचा योग्य सन्मान होत आहे.
सरकारने सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना विविध गोष्टींमध्ये सूट उपलब्ध करून दिली आहे. शासनाने महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी वाढावी यासाठी देखील विशेष प्रयत्न केले आहेत. जर महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी केली गेली तर सदर मालमत्तेवर मोठा पैसा देखील वाचवता येऊ शकतो.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आज आपण महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास त्यांना कोण-कोणते बेनिफिट मिळतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मिळणार हे दोन मोठे फायदे
कमी व्याजदरात मिळणार होम लोन : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या किंवा तुमच्या आईच्या नावाने घर खरेदी केले पाहिजे. कारण की देशातील अनेक प्रमुख बँकांच्या माध्यमातून महिलांना स्वस्तात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
महिलांना कमी इंटरेस्ट रेट वर होम लोन मिळत आहे. देशातील खाजगी, सरकारी बँका तसेच अनेक हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून महिलांना कमी इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
स्टॅम्प ड्युटीवर देखील मोठी सूट मिळणार : कोणतीही प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेपरवर्क करावे लागते. यावर मोठा खर्च होत असतो. घर खरेदी करतांना स्टॅम्प ड्युटी देखील भरावी लागते. मात्र जर महिलांच्या नावाने घर खरेदी झाली असेल तर स्टॅम्प ड्युटीवर ठराविक सवलत दिली जात असते.
स्टॅम्प ड्युटीवर दिली जाणारी ही सवलत वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्नभिन्न असल्याचे आढळते. काही राज्यांमध्ये महिलांना स्टॅम्प ड्युटी मध्ये दोन ते तीन टक्के सवलत दिली जाते. यामुळे जर तुम्हालाही स्वस्तात प्रॉपर्टी बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने किंवा तुमच्या आईच्या नावाने प्रॉपर्टीची खरेदी केली पाहिजे.