खरीप हंगामात कांद्याच्या ‘या’ दोन जातींची लागवड करा मिळणार विक्रमी उत्पादन ! वाचा याच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Farming : हवामान खात्याने नुकतीच मानसून बाबत गुड न्यूज दिली आहे. हवामान खात्याने येत्या काही तासात मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असे म्हटले आहे. यावर्षी मान्सूनचे अंदमानात 19 मेला आगमन होण्याची शक्यता आहे तसेच केरळमध्ये मानसून 31 मेच्या सुमारास दाखल होणार असे म्हटले जात आहे.

यावर्षी मानसून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातून यावर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार अशी आशा आहे.

दरम्यान जर तुम्ही येत्या खरीप हंगामात कांद्याची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आपण कांद्याच्या दोन सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेल्या फुले समर्थ आणि फुले बसवंत 780 या जातीची आज आपण माहिती पाहणार आहोत.

फुले समर्थ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाने विकसित केलेला फुले समर्थ हा कांद्याचा वाण खरीप आणि रांगडा हंगामासाठी उपयुक्त आहे. राज्यातील शेतकरी या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत.

या जातीचे कांदे गर्द लाल रंगाचे असतात. या जातीचे पीक अवघ्या 86 ते 90 दिवसात परिपक्व होत असते. म्हणजे लागवडीनंतर तीन महिन्यांनी या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी रेडी होते.

जर तुम्ही खरीप हंगामात लागवड केली तर या जातीपासून 280 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. रांगडा हंगामात लागवड केल्यास मात्र उत्पादनात वाढ होते आणि यापासून 400 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते.

फुले बसवंत 780 : या जातीचा कांदा खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. याची रब्बी हंगामात लागवड केली तर गडद लाल रंगाचा हा कांदा साठवणुकीत तीन ते चार महिने टिकतो. यापासून हेक्टरी अडीचशे ते तीनशे क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.

राज्यातील बहुतांशी भागांमध्ये या जातीची लागवड केली जात आहे. नाशिक, अहमदनगर समवेतच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फुले बसवंत 780 या जातीची खरीप आणि रब्बी हंगामामध्ये लागवड होत आहे. जर तुम्ही येत्या खरीप हंगामात कांद्याची लागवड करत असाल तर फुले बसवंत ७८० या जातीची लागवड करू शकता. 

Leave a Comment