कमालच ! लोकांना आपापसात लढवून ‘त्या’ अवलियाने उभे केले करोडो रुपयांचे साम्राज्य, कोण आहेत WWE चे संस्थापक ? कशी झाली याची सुरवात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WWE Founder Vince McMahon : यशस्वी होण्यासाठी कठोर, परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांची सचोटी आवश्यक असते. यशाचे गिरीशिखर सर करण्यासाठी या गोष्टी व्यक्तीने साध्य केल्याचं पाहिजेत. पण या गोष्टींसोबतच यशस्वी होण्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते आणि ती गोष्ट म्हणजे यशाची कल्पना.

यशस्वी होण्यासाठी यशस्वी कल्पना सुचने देखील आवश्यक आहे. जर सुचलेली कल्पना युनिक, अद्वितीय असेल तर माणूस निश्चितच यशस्वी होऊ शकतो. अनेकांनी असे काम करून दाखवले आहे.

दरम्यान आज आपण अशाच एका यशोगाथेविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण अशा एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने लोकांना आपापसात लढवून करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. आम्ही ज्या अवलिया विषय बोलत आहोत ते आहेत डब्ल्यूडब्ल्यूई चे संस्थापक Vince McMahon.

विन्स मॅकमोहन हे डब्ल्यूडब्ल्यूईचे संस्थापक आहेत. मॅकमोहन एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आले. गरिबीत जन्मलेले मॅकमोहन आज करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचा जन्म सन 1945 मध्ये कॅरोलिनाच्या पायहर्स्ट येथे झाला. मॅकमोहन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. विन्सचे वडील कुस्तीची एक छोटीशी कंपनी चालवत असत.

त्यावेळी या कंपनीचे उत्पन्न खूपच कमी होते. दरम्यान 1970 मध्ये विन्सने वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या कंपनीत त्यांनी रिंगसाइड उद्घोषक म्हणून काम सुरु केले. तेव्हा ही कंपनी कॅपिटल रेसलिंग कॉर्पोरेशन या नावाने ओळखली जात असत. या कंपनीचे नाव 1979 मध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजेच जागतिक कुस्ती महासंघ असे करण्यात आले.

यानंतर 1982 मध्ये विन्सने ही कंपनी खरेदी केली. कंपनीची कमान आपल्या हातात घेतल्यानंतर मॅकमोहन यांनी यात अनेक बदल केलेत. सुरुवातीला व्यवसायिक कुस्ती लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध नव्हती. पण व्यावसायिक कुस्ती लोकांमध्ये प्रसिद्ध करण्याचं खरं श्रेय मॅकमोहन यांना द्यावे लागेल. त्यांनी ही कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर स्क्रिप्टेड फाईट, भडक विधानं, संगीत, कुस्तीगीर आणि महिला कुस्तीपटूंच्या एन्ट्रीसह व्यावसायिक कुश्ती घराघरात पोहोचवली.

व्यावसायिक कुस्तीला पसंती मिळाली आणि कंपनीचा टर्नओव्हर देखील वाढला. या कंपनीमधून विन्स यांना चांगली कमाई होऊ लागली. पुढे 1999 मध्ये या कंपनीचा आयपीओ आला. शेअर बाजारात उतरल्यानंतर या कंपनीने 18 अब्ज डॉलर उभे केलेत. एवढेच नाही तर डब्ल्यू डब्ल्यू एफ ही कंपनी त्याकाळी एक अब्ज डॉलरची कंपनी बनली. दर आठवड्याला एक ते दोन कोटी प्रेक्षक WWF ला मिळू लागलेत. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मात्र विन्स मॅकमोहन यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले.

असभ्यता, वाईट भाषेचा वापर आणि स्टेरॉईड्सचा प्रचार करण्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून 90 च्या दशकात डब्ल्यू डब्ल्यू एफ चा प्रेक्षकवर्ग बऱ्यापैकी कमी झाला. अशातच मॅकमोहन यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी WWF ला मालिकाप्रमाणे रचले. यासाठी नवीन लेखक नियुक्त केले आणि मालिकाप्रमाणे स्क्रिप्ट लिहिल्या जाऊ लागल्या.

या उपाययोजना केल्यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली. 1999 पर्यंत WWF पुन्हा एकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण जगभरात या डब्ल्यू डब्ल्यू एफ चा मोठा चाहता वर्ग तयार झाला. अशातच मात्र 2002 मध्ये त्यांना आपल्या कंपनीचे नाव बदलावे लागले. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजे WWFN या संस्थेची स्थापना झाल्यानंतर त्यांना आपल्या कंपनीचे नाव बदलावे लागले.

2002 मध्ये मग त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफ या कंपनीचे नाव बदलून डब्ल्यूडब्ल्यूई अर्थातच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट असे ठेवले. नावाप्रमाणेच कंपनीचा कंटेंट देखील बदलू लागला. जरी कन्टेन्ट बदलला असला तरी देखील त्यांचा चाहता वर्ग मात्र कायम आहे. 2009 पासून कंपनीने लहान मुलांना अनुसरून कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या स्थितीला WWE चे कार्यक्रम जगातील एकूण 150 देशांमध्ये प्रसारित केले जात असून 30 भाषांमध्ये हे कार्यक्रम प्रसारित होत आहेत.

कंपनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास एक अब्ज डॉलरची कमाई करत आहे. विशेष म्हणजे मॅकमोहन यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. दरम्यान गेल्यावर्षी त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू ई कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे.

ते सध्या TKO कंपनीचे अध्यक्ष असून ही कंपनी डब्ल्यू डब्ल्यू ई ची प्रमुख कंपनी आहे. निश्चितच मॅकमोहन यांनी व्यावसायिक कुस्ती घराघरात पोहोचवून उभे केलेले हे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य एका यशस्वी कल्पनेचे फळ आहे. गरिबीतून श्रीमंतीकडे घेऊन जाणारा मॅकमोहन यांचा हा प्रवास तरुण वर्गाला निश्चितच प्रेरणा देणारा राहणार आहे यात शंकाच नाही. 

Leave a Comment