7th Pay Commission : सध्या देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा पर्व मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून 28 सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.
अशा या सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता संदर्भात. मीडिया रिपोर्ट नुसार, देशभरातील एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता म्हणजेच डीए तर वाढवला जाणारच आहे याशिवाय महागाई भत्ता थकबाकी म्हणजेच डीए एरियर देखील कर्मचाऱ्यांना देऊ केला जाणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता फरकाची म्हणजेच थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळणार असल्याने याचा त्यांना सणासुदीच्या काळात मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% एवढा वाढवला होता. आधी 38% एवढा महागाई भत्ता त्यांना मिळत होता. पण जानेवारी महिन्यात चार टक्के वाढ केल्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के एवढा झाला आहे.
म्हणजे आता जुलै महिन्यात महागाई भत्त्यात आणखी वाढ होणार आहे. महागाई भत्यामध्ये आणखी 3 टक्के वाढ केली जाणार आहे. त्यानुसार जुलै महिन्यापासून 45 टक्के एवढा महागाई भत्ता होणार आहे.
केव्हा होणार निर्णय?
केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार आहे.
जुलै महिन्यापासून महागाई भत्ता लागू केला जाणार असल्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. खरतर गेल्या वर्षी देखील जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा सप्टेंबर 2022 मध्येच झाला होता.
यामुळे यंदा देखील सप्टेंबरच्या अखेरपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर नवरात्री सुरू होण्याच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट राहणार आहे.