7th Pay Commission:- सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढी संदर्भात अनेक चर्चा सध्या सुरू असून सोशल मीडिया मधून देखील यासंबंधीच्या बातम्या सातत्याने प्रसारित होत आहेत. महागाई भत्तावाढी बाबतची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार अशी सध्या शक्यता दिसून येत आहे.
केंद्र सरकार या महिन्याभरामध्ये 2023 या वर्षातील दुसरी महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. जर आपण सरकारी सूत्रांच्या हवाल्याने व काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर महागाई भत्ता वाढीची घोषणा या महिन्याच्या शेवटी किंवा नवरात्रीच्या जवळपास होऊ शकते अशी एक शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तीन टक्के महागाई भत्ता वाढ होण्याची शक्यता असून जर हा निर्णय झाला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या 42 टक्क्यांवरून 45% पर्यंत महागाई भत्ता मिळू शकणार आहे.
केव्हापासून लागू होईल ही वाढ?
वर्षातून साधारणपणे दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. त्या अनुषंगाने 2023 या वर्षातील दुसरी महागाई भत्तावाढ जाहीर झाल्यानंतर ती जुलै 2023 पासून लागू होईल. महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ व्हावी अशा पद्धतीची कर्मचाऱ्यांची मागणी होती. परंतु जर आपण महागाई निर्देशांक पाहिला तर त्यावरून हा आकडा तीन टक्क्यांवरच राहील अशी शक्यता आहे. तीन टक्क्याची जरी वाढ झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आपल्याला माहित असेलच की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढीची गणना कामगार ब्युरोच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारी वरून ठरवला जातो. याबाबतीत जर आपण ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेली माहिती पाहिली तर त्यांनी पीटीआयला माहिती देताना म्हटले होते की,
जून 2023 साठी सीपीआय- आयडब्ल्यू 31 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला होता व यामध्ये चार टक्के वाढ करण्याची आमची मागणी आहे. परंतु महागाई भत्त्यातील झालेली वाढ तीन टक्क्यांपेक्षा थोडी जास्त आहे व दशांश बिंदूंच्या पलीकडे महागाई भत्ता वाढवण्याचा सरकारचा विचार नाही त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ ही चार टक्क्यांऐवजी तीन टक्के करण्यात येईल व ती एकूण 45% पर्यंत होईल अशी शक्यता आहे.