धक्कादायक ! महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढणार नाही, ‘इतका’ वाढणार DA, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission DA Hike News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

सणासुदीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांसाठी थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 46% एवढा झाला आहे. जुलै 2023 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी देखील वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते.

पण अजून राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाढीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता लवकरच वर्तमान शिंदे सरकार याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे एक महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे याबाबतचा प्रस्ताव देखील तयार झाला असल्याचे सांगितले जात आहे.

सदर प्रस्तावानुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के डीए वाढ मिळणार नसून फक्त 2% डीए वाढ दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना शिंदे सरकार जोर का झटका देणार अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

जर हा निर्णय झाला तर सणासुदीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अद्याप शासनाच्या माध्यमातून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये जुलै 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांना फक्त दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे सांगितले जात आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आता दोन टक्के वाढ होणार असे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 44% एवढा होईल. जुलै 2023 पासून ही वाढ लागू केली जाईल. अर्थातच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

दरम्यान दोन टक्के डीए वाढीबाबतचा हा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असून याचा रोखीने लाभ या चालू महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत दिला जाईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कमही मिळणार आहे. एकंदरीत जर शिंदे सरकारने चार टक्क्यांऐवजी फक्त दोन टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा केली तर,

राज्यातील लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा भ्रमनिरास होणार आहे. यामुळे आता राज्य शासन आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment