आताची सर्वात मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 50 हजार रुपये मिळणार, कोणाला मिळणार लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात उद्यापासून अर्थातच गोवत्स द्वादशीपासून दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यावर्षी 15 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीचा सण राहील.

एकंदरीत दिवाळीला सुरुवात होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पहायला मिळतं आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येवर राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता दिवाळी बोनस म्हणून 50 हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. यामुळे संबंधिताची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सानूग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

गेल्यावर्षीही एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात अनुदानाची भेट मिळाली होती. यावर्षीही एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला आहे.

अशातच आता सिडको महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. सिडको हे राज्यातील एक महत्त्वाचे आणि प्रमुख महामंडळ आहे. हे महामंडळ राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, सिडकोने आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. सिडकोमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

सिडकोमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळी बोनस म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे संबंधितांची दिवाळी यंदा गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

सिडकोकडून दरवर्षी दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. यावर्षीही दिवाळी बोनस देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. कर्मचाऱ्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून सिडकोच्या कर्मचाऱ्यांना 50 हजाराचे सानुग्रह अनुदान अर्थातच बोनस जाहीर करण्यात आले आहे.

काल अर्थातच 7 नोव्हेंबर 2023 रोजी, मंगळवारी सिडकोच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या संबंधित कर्मचाऱ्यांचा बँक खात्यात लवकरात लवकर ही अनुदानाची रक्कम जमा होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment