7th Pay Commission : शिंदे सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने काल 23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवला होता. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजे DA मिळत आहे. आधी हा भत्ता 42 टक्के एवढा होता.
दरम्यान, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे अशी मागणी केली जात होती. राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळावा अशी मागणी केली जात होती.
यासाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा देखील केला जात होता. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्स मध्ये याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाने तयार केला असल्याचे वृत्त समोर आले होते.
तसेच काल एका मीडिया रिपोर्ट मध्ये वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय तयार केला असून फक्त अधिकृत शासन निर्णय अर्थातच जीआर जारी होणे बाकी असल्याची बातमी समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर आज शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज याबाबतचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदर शासन निर्णयानुसार, आता राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणार आहे.
ही वाढ जुलै 2023 पासून लागू राहणार आहे. आधी या लोकांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता. यामध्ये मात्र राज्य शासनाने 4% वाढ देण्याचा निर्णय घेतला असून महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार
काल 23 नोव्हेंबर 2023 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, शिंदे सरकारने जुलै 2023 पासून महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. तसेच याचा रोखीने लाभ या चालू महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
म्हणजेच डिसेंबर महिन्यात जे वेतन हातात पडेल त्या वेतनासोबत याचा लाभ मिळणार आहे. यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधितांना दिली जाणार आहे.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम या चालू महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे.