काय सांगता ! रॉयल एनफिल्डची ‘ही’ बुलेट देते तब्बल 70 KMPL चे मायलेज, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Royal Enfield Bullet Taurus Mileage : रॉयल एनफिल्ड बुलेट ही देशातील एक लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळते. बुलेटची फायरिंग आणि तिचा रेट्रो लूक या बाईकला इतर गाड्यांपेक्षा वेगळे बनवते. ही बाईक अलीकडेच लोकप्रिय बनली आहे असे नाही तर ही बाईक फार वर्षांपासून देशातील तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे.

या बाईकच्या लवर्सची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. आपल्या देशात रॉयल एनफिल्डची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र या बाईकचे मायलेज हे इतर गाड्यांपेक्षा थोडेसे कमी आहे. ही देशातील लोकप्रिय बाईक जवळपास 35 ते 40 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.

मात्र जर तुम्हाला आम्ही सांगितले की रॉयल एनफिल्डची एक बुलेट अशी आहे जी तब्बल 70 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देते, तर तुमचा यावर विश्वास बसणार का? याच उत्तर कदाचित नाही असेच असेल. कारण रॉयल एनफिल्डची बुलेट ही बाईक सध्या एवढे मायलेज देतच नाही.

पण देशात अशीही एक डिझेल बुलेट होती जी तब्बल 70 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देत असे. Royal Enfield Taurus ही कंपनीची एक लोकप्रिय बाईक होती. ही गाडी तब्बल सत्तर केएमपीएलचे मायलेज देत असे. आज आपण ऐंशीच्या दशकात रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय Royal Enfield Taurus या बाईक बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

केव्हा सुरु झाली Royal Enfield Taurus

Royal Enfield Taurus ही एक डिझेल बाईक होती. ही गाडी कंपनीने 80 च्या दशकात लाँच केली होती. ही गाडी भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आणि अवघ्या काही दिवसातच ही गाडी देशात सुपरहिट ठरली. या गाडीने तरुणाईला अक्षरशः वेड लावले. सर्व लोकांना ही बाईक आवडू लागली. या बाईकचा लूक आणि या गाडीचे मायलेज लोकांच्या पसंतीस खरे उतरले.

ही गाडी दिसायला प्रीमियम होती शिवाय मायलेज पण छान होते यामुळे या गाडीने मार्केटमध्ये लवकरच आपला जम बसवला. ही गाडी जवळपास सन 2,000 पर्यंत देशात विकली गेली. नंतर मात्र या गाडीचे उत्पादन बंद झाले. पण ही गाडी ज्यावेळी बंद झाली त्यावेळी या गाडीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. ही देशात सर्वाधिक काळ विकली जाणारी एक देशातील लोकप्रिय डिझेल बाईक बनली.

बाईकच्या विशेषता

कंपनीने ही गाडी त्यावेळी सुद्धा देशातील तरुणाईला लक्षात ठेवूनच बनवण्यात आली असावी. यामुळे या बाइकमध्ये पावरफुल इंजिन बसवण्यात आले होते. या गाडीत ३२५ सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर डिझेल इंजिन बसवले गेले होते. म्हणून त्याकाळी ही एक दमदार बाईक म्हणून ओळखली जात असे. या गाडीत दमदार इंजिन असल्याने ऑफ रोडींगसाठी देखील ही बाईक खूप फेमस झाली होती. पण ही गाडी फक्त 6.5 BHP ची उर्जा निर्माण करत होती.

मात्र त्यावेळी असलेल्या बाईक पेक्षा या गाडीच्या इंजिनिची क्षमता थोडीशी चांगली होती. आजच्या 350 cc बुलेट बद्दल बोलायचं झालं तर सध्याची बुलेट तब्बल 19.7 bhp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. साहजिकच काळाच्या ओघात तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. यामुळे आत्ताची बाईक ही त्या बाईक पेक्षा सरसच राहणार आहे. परंतु त्या काळी बनवण्यात आलेली ही गाडी त्या काळातील एक सर्वोत्कृष्ट बाइक होती यात शंकाच नाही.

दरम्यान Taurus बुलेटच्या स्पीड बाबत बोलायचं झालं तर त्या गाडीचा टॉप स्पीड हा फक्त 65 किलोमीटर प्रति तास एवढा होता. आताच्या बुलेटशी कम्पेअर केले तर निश्चितच जुनी गाडी स्पीडच्या तुलनेत खूपच मागे आहे. एवढेच नाही तर या बुलेटचे वजनही सामान्य 350 सीसी पेट्रोल बुलेटपेक्षा खूप जास्त होते. त्याचे एकूण वजन 196 किलो होते, तर पेट्रोल बुलेटचे वजन हे 168 किलो एवढे होते.

2000 साली कंपनीने या बाईकचे प्रोडक्शन बंद केले मात्र यानंतरही पंजाबमधील एका ट्रॅक्टर निर्माती कंपनीने या बाईकचे प्रोडक्शन थोडेसे चेंजेस करून काही काळ सुरू ठेवले होते. सध्या या बाईकचे कुठेच प्रोडक्शन होत नाही. पण काही बाईक प्रेमींकडे आजही ही डिझेल बाईक पाहायला मिळते. म्हणजे 70kmpl चे मायलेज देणारी रॉयल एनफिल्ड बाईक आजही भारतात पाहायला मिळते.

Leave a Comment