नागरिकांनो सावधान ! ‘या’ तारखेला महाराष्ट्रात गारपीट होणार, कुठं पडणार गारा ? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय म्हणतोय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. खर तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे.

मध्यंतरी राज्यातील हवामानात एक बदल झाला होता, त्यावेळी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. त्यावेळी कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस झाला होता. पावसामुळे त्यावेळी काढण्यासाठी तयार झालेले भात पिक प्रभावित झाले होते.

अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल होणार आहे आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आता ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात गारपीट होणार आहे.

याबाबत भारतीय हवामान विभागाने सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

तर काही ठिकाणी गारपीट देखील होईल असा अंदाज आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत येत्या काही दिवसात पाऊस पडणार आहे. एवढेच नाही तर 26 नोव्हेंबरला राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्रात रविवारी गारपिट होणार असा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच IMD ने पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे येणार आहेत आणि पश्चिमेकडूनही वारे वाहणार आहेत असे सांगितले असून या दोन्ही दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा संयोग होणार असा अंदाज बांधला आहे.

विशेष म्हणजे या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागात 24 नोव्हेंबर पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, या भागात 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.

याशिवाय या कालावधीमध्ये महाराष्ट्र शेजारील राज्य गोव्यात, मध्य प्रदेशच्या नैऋत्य भागात आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांत देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण २६ तारखेला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या दिवशी राज्यातील उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटी होणार असा अंदाज IMD ने बांधला आहे. या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि कोकणातही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे.

यामुळे ज्या भागात मुसळधार पावसाची आणि गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेथील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासंबंधीत भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचे, शेतमालाचे आणि पशुधनाचे मुसळधार पावसापासून आणि गारपिटीपासून संरक्षण करावे असा सल्ला देखील जाणकार लोकांनी दिला आहे.

Leave a Comment