7th Pay Commission HRA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकार HRA म्हणजेच घर भाडे भत्ता वाढवणार आहे. यात तीन टक्क्यांची वाढ होणार असा दावा केला जात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढवला. यानुसार सदर नोकरदार मंडळीला सध्या 46% DA मिळत आहे. आधी हा भत्ता फक्त 42 टक्के एवढा होता. अर्थात डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे.
अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये घरभाडे भत्ता संदर्भात चर्चा पाहायला मिळत आहेत. सरकार लवकरच एचआरए वाढवणार असा दावा केला जात आहे.
पण याबाबतचा निर्णय अखेर केव्हा होणार ? लोकसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय होणार का? हा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वारंवार उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आज आपण सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या शासन परिपत्रकाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
या एक जानेवारी 2019 रोजी जारी झालेल्या शासन परिपत्रकामध्ये घर भाडे भत्ता केव्हा वाढवला पाहिजे आणि किती वाढवला पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
केव्हा वाढणार HRA ?
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या निवासस्थानावरून घर भाडे भत्ता ऑफर केला जात आहे. यानुसार, एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, Y श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 9 टक्के एवढा एचआरए दिला जात आहे.
हा HRA दर ज्यावेळी महागाई भत्ता 25% झाला तेव्हा लागू करण्यात आले. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या एका आदेशात ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी सुधारित करावा असे देखील सांगितले गेले आहे.
सध्या महागाई भत्ता 46% एवढा आहे. जानेवारी महिन्यापासून DA 51% होईल असा अंदाज आहे. यामुळे नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच HRA वाढवला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.
किती वाढणार HRA
ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा घर भाडे भत्ता सुधारित करावा असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद केले आहे. तसेच यात X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 30%, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा 20% आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा दहा टक्के केला पाहिजे असे म्हटले आहे.