हवामान अंदाज : आणखी चार-पाच दिवस ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2023 : डिसेंबरचा पहिला आठवडा उलटला आहे. मात्र अजूनही देशात थंडीला सुरुवात झालेली नाही. कडाक्याची थंडी अजूनही पडत नाहीये. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे पण तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे अजून थंडीला सुरुवात झालेली नाही.

यामुळे कडाक्याचे थंडी केव्हा पडणार हा सवाल कायम आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. हवामान विभागाने सांगितले की, देशात आणखी चार ते पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अर्थातच थंडीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. खरंतर, या चालू महिन्यात अगदी सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला.  यानंतर हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परावर्तित झाला.

याच चक्रीवादळामुळे देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. आपल्या राज्यातही या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पाहायला मिळाला आहे.

पण आता चक्रीवादळ निवळले आहे. मात्र तरीही देशातील केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस बरसणार अस हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.

एवढेच नाही तर 12 डिसेंबरपर्यंत सिक्कीम, बंगालमध्ये काही भागात गारपीट होईल असा देखील अंदाज आयएमडीने दिला आहे.

आज कुठं बरसणार पाऊस 

IMD ने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, आगामी 24 तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विशेष सावध राहण्याची गरज आहे. तथापि आपल्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.

हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा कोणताच इशारा दिलेला नाही. मात्र असे असतानाही राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडत नाहीये.

Leave a Comment