7th Pay Commission Latest Update : दरवर्षी भारतात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यावर्षीही संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 9 तारखेपासून सुरू झालेला हा सण 15 नोव्हेंबर पर्यंत साजरा केला जाणार आहे.
दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ठरली आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सणाच्या पूर्वीच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट दिली होती.
विजयादशमीला केंद्र शासनाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती. यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली असल्याने महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
यामुळे संबंधितांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. अशातच दिवाळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असे वृत्त समोर आले आहे.
सरकार कोणते निर्णय घेणार ?
हाती आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची आणखी एक भेट मिळणार आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. सध्या 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
पण यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. यानुसार महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे. जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू होईल असे सांगितले जात आहे. तसेच केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता वाढवण्याचा दुसरा मोठा निर्णय घेणार अशी शक्यता आहे.
डीए वाढल्याने प्रवास भत्ता (TA) देखील वाढवला जाणार आहे. प्रवास भत्ता वेगवेगळ्या पे बँडशी जोडलेला आहे. उच्च टीपीटीए शहरांमध्ये, ग्रेड 1 ते 2 साठी प्रवास भत्ता रुपये 1800 आणि 1900 रुपये आहे. ग्रेड 3 ते 8 ला 3600 रुपये + DA मिळतो.
तर, इतर ठिकाणी हा दर रु 1800 + DA एवढा आहे. याशिवाय, घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा तिसरा मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. पुढील वर्षी घरभाडे भत्त्यात म्हणजे HRA मध्ये सुधारणा होणार आहे. HRA मध्ये 3 टक्के एवढी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी घर भाडे भत्ता वाढवला जाईल.
सध्या HRA 27, 18 आणि 9 टक्के दराने दिला जात आहे. हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार बदलतो. वास्तव्याच्या ठिकाणानुसार घर भाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड अशा श्रेणीमध्ये विभागण्यात आला आहे. सध्या स्थितीला X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना १८ टक्के आणि झेड श्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांना नऊ टक्के घर भाडे भत्ता दिला जात आहे.
यात आता तीन टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाणार आहे. यानुसार, X कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता तीस टक्के, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा HRA 20 टक्के आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा HRA दहा टक्के होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे तिन्ही निर्णय मार्च 2024 पर्यंत घेतले जातील असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने हे तिन्ही महत्त्वाचे निर्णय मार्च महिन्याच्या पूर्वीच घेतले जातील असे मत काही जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आले आहे. यामुळे आता सरकार याबाबत केव्हा निर्णय घेते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.