राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! शिंदे सरकार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार ‘हा’ मोठा निर्णय, केव्हा होणार बैठक ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पूर्व संध्येवर राज्यातील शिंदे सरकार लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ ची लवकरच भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, विजयादशमीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए हा चार टक्के वाढविण्यात आला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे. आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 4% वाढवला जाणार आहे.

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, याबाबतचा निर्णय आज अर्थातच 8 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. म्हणजे आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46 टक्के एवढा होणार आहे.

आतापर्यंत या संबंधितांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत होता. यामध्ये आता चार टक्के वाढ होईल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे.

तसेच या DA वाढीचा लाभ या चालू महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारांसोबत याचा लाभ मिळणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील दिली जाणार आहे.

यामुळे या संबंधित सरकारी नोकरदार वर्गाची दिवाळी यंदा जोरात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्यातील जनतेचे विशेष लक्ष राहणार आहे.

Leave a Comment