7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या ऑक्टोबर महिन्यातही विविध सणांची रेलचल पाहायला मिळणार आहे.
नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दुर्गा अष्टमी या सणांची ऑक्टोबर मध्ये मोठी धूम राहणार आहे. यामुळे सर्वत्र उल्हासाचे वातावरण देखील तयार होत आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि कामाची बातमी समोर येत आहे.
सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मोठी भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या सणासुदीच्या दिवसात महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाणार आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची आशा आहे. दरम्यान, आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढवला जाऊ शकतो आणि याचा निर्णय नेमका केव्हा होण्याची शक्यता आहे, याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता किती वाढणार
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्के वाढवला जाणार आहे. सध्या 42% टक्के एवढा महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे. मात्र आता यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे. अर्थातच महागाई भत्ता 46 टक्के होणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील. याचाच अर्थ सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम या ठिकाणी मिळणार आहे.
केव्हा होणार निर्णय
महागाई भत्ता चार टक्के वाढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण याबाबतचा निर्णय केंद्र शासन केव्हा घेणार हा मोठा सवाल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच एका मीडिया रिपोर्ट मधून याबाबतचा निर्णय विजयादशमीनंतर आणि दिवाळीच्या आधी केंद्र शासन घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामुळे जर दिवाळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम मिळणार आहे.
किती पगार वाढू शकतो
महागाई भत्ता वाढल्यानंतर किती पगार वाढणार हा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता आपण या प्रश्नाचे उत्तर एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर समजा एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला दरमहा 38,500 रुपये मूळ वेतन मिळते.
त्याला सध्याच्या दरानुसार म्हणजे 42% DA नुसार, 16,170 रुपये डीए मिळत आहे. आता डीए 4% ने वाढल्यास म्हणजे DA 46% झाल्यास व्यक्तीला 17,710 रुपये महिन्याला DA मिळेल. यावरून सदर कर्मचाऱ्यांच्या पगारात 17,710 रुपये – 16,170 रुपये = 1,540 रुपये दरमहा वाढ होणार आहे.