सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याचा लाभ केव्हा मिळणार ? समोर आली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सदर सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% झाला आहे. याबाबतचा निर्णय मार्चच्या पहिल्या आठवड्यात झाला आहे.

विशेष म्हणजे वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबतच दिली गेली आहे.

त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वृद्धी झाली असून याचा सदर नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळाला आहे. पण, ज्यावेळी महागाई भत्ता 50% होईल तेव्हा घर भाडे भत्ता देखील सुधारित केला जाईल असे म्हटले जात होते.

अशा परिस्थिती आता घर भाडे भत्ता वाढीबाबतची अधिसूचना कधी काढली जाणार हा मोठा सवाल सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.

खरे तर महागाई भत्ता 50% झाल्यानंतर वेगवेगळे भत्ते वाढवले गेलेत. या भत्त्यांची यादी डीओपीटीने आधीच जाहीर केली आहे. डीए वाढल्यानंतर त्यात सुधारणा केली गेली आहे.

मात्र, एचआरएमधील बदलांबाबत अद्याप कोणताही आदेश जारी झालेला नाही. आता केंद्र सरकार एचआरएमधील बदलांची वेगळी माहिती देणार का, हा प्रश्न आहे.

कारण DA 50% वर पोहोचला आहे? अशा परिस्थितीत एचआरएमध्ये किती वाढ होणार?  हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान आता आपण एच आर ए मध्ये किती वाढ होऊ शकते हे पाहुयात.

किती वाढणार HRA ?

एचआरए म्हणजे घर भाडे भत्ता मोजण्यासाठी कर्मचारी ज्या शहरात आहेत ती शहरे काही घटकांच्या आधारे X, Y आणि Z श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत. दरम्यान या शहरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या घर भाडे भत्ता दिला जात आहे.

सध्या एक्स कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के असा घर भाडे भत्ता दिला जात आहे. ही वाढ ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 25 टक्के झाला होता त्यावेळी झाली होती.

आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला असल्याने एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा हा घर भाडे भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment