8th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण मोदी सरकार नवीन आठवा वेतन आयोग लागू करणार की नाही आणि आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात नवीन वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. केंद्र शासनानेही नवीन वेतन आयोगाबाबत सरकारची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतचा प्रस्ताव सध्या तरी सरकारकडे विचाराधीन नसल्याचे सांगितले होते.

Advertisement

त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणार की नाही ? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. ज्यावेळी सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी नवीन वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू करण्याची सूचना करण्यात आली होती. सातवा वेतन आयोग लागू होऊन आता जवळपास सात वर्षांचा काळ उलटला आहे.

सेवंथ पे कमीशन 2016 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आले होते. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीच्या समितीची स्थापना 2014 मध्येच करण्यात आली होती. आता नवीन आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे म्हणून याच्या समितीची स्थापना पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये झाली पाहिजे.

Advertisement

मात्र केंद्र शासनाने नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत अद्याप शासन स्तरावर विचार सुरू नसल्याचे स्पष्ट केले असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, आज आपण केंद्र शासन नवीन वेतन आयोग लागू करणार की नाही याबाबत जाणकार लोकांना काय वाटते याविषयी जाणून घेणार आहोत.

मोदी सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार का

Advertisement

हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या प्रस्तावावर मोदी सरकार सध्या विचार करत नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासून मात्र मुद्द्यावर वेगवेगळ्या चर्चा पाहायला म्हणत आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी कर्मचाऱ्यांना थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.

कर्मचार्‍यांनी थोडा संयम ठेवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.  कारण, 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकार अजून काहीही बोलणार नाही. वास्तविक, त्याच्या नियोजनाला अजून वेळ आहे. पण 8 व्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत. म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो.

Advertisement

तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे आठवा वेतन आयोगासाठी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर समितीची स्थापना होऊ शकते. तसेच समितीची स्थापना झाल्यानंतर 2026 पर्यंत हा नवीन वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केला जाईल. आठवा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे.

सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 18000 रुपये एवढे मूळ वेतन मिळत आहे. मात्र नवीन आठवा वेतन आयोगांतर्गत हे किमान मूळ वेतन 26 हजार रुपये एवढे होईल असे सांगितले जात आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 8000 रुपयांची वाढ होणार आहे.

Advertisement

कर्मचाऱ्यांना सध्या ती 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू आहे. पण हा फिटमेंट फॅक्टर 3.68 पट पर्यंत जाऊ शकतो. या आधारावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ४४.४४ टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन २६ हजार रुपये होईल असे तज्ञ लोकांचे म्हणणे आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *