महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल गव्हाच्या जाती कोणत्या ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून आता खरिपातील शेतमाल बाजारात विक्रीसाठी देखील दाखल झाला आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीन आणि कापसाच्या नवीन मालाची विक्री करत आहेत. बाजारात मात्र सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये.

यामुळे दुष्काळामुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. खरंतर दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादण कमी होणार असा अंदाज आहे आणि अशातच उत्पादित झालेल्या मालाला देखील चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी पाहायला मिळत आहे.

दरम्यान शेतकरी बांधव आता खरीप हंगामातील कसर रब्बी मधून भरून काढण्यासाठी मैदानात उतरला आहे. रब्बी पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता आहे आणि ज्या ठिकाणी मान्सून काळात चांगला पाऊस बरसला आहे तेथे गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.

परंतु एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राज्यात रब्बी हंगामामध्ये कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र कमी होऊ शकते असे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी यावर्षी शेतकरी बांधवांनी जर गव्हाच्या योग्य वाणाची पेरणी केली तर त्यांना गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. यामुळे आज आपण महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल ठरणाऱ्या गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

अजित 109 : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. या जातीची महाराष्ट्रात लागवड केली जाऊ शकते. या वाणाची ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान पेरणी केली जाते. वेळेवर गहू पेरणीसाठी हा एक उत्कृष्ट वाण ठरतो. पेरणीनंतर साधारणता 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीपासून सरासरी 15 ते 20 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीच्या पिकासाठी साधारणतः चार ते पाच पाणी द्यावे लागते. या जातीच्या पिकाची उंची सरासरी 90 ते 100 सेंटीमीटर असते.

श्रीराम सुपर 303 : महाराष्ट्रातील हवामान यादेखील जातीला मानवते. या जातीची राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. हा वाण पीक पेरणीनंतर सरासरी 125 ते 130 दिवसात परिपक्व होतो. या जातीपासून एकरी 25 ते 28 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळते. या पिकाला तीन ते पाचदा पाणी द्यावे लागते. या जातीच्या गव्हाची उंची 80 ते 88 सेंटीमीटर एवढी राहते. उंचीला कमी असणारा गव्हाचा हा वाण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पेरला जाऊ शकतो.

सिजेंटा कंपनीचे Neenv 1544 : सिजेंटा कंपनीचा हा देखील वाण महाराष्ट्रातील हवामानात उत्कृष्ट ठरतो. या जातीचे पीक पेरणीनंतर सरासरी 115 ते 120 दिवसात परिपक्व होते आणि यापासून 15 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीच्या पिकाला सरासरी चार ते पाचदा पाणी भरावे लागते. या जातीच्या पिकाची उंची मध्यम असते आणि पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाऊ शकते.

श्रीराम सुपर 111 : गेल्या काही वर्षांमध्ये हा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. हा वाण उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. या जातीचे पीक सरासरी 115 ते 120 दिवसात परिपक्व होते आणि एकरी 22 ते 25 क्विंटल चा उतारा या जातीपासून मिळतो. या जातीच्या पिकासाठी चार ते पाचदा पाणी भरावे लागते. या जातीचे पीक उंचीला थोडे जास्त असते. पीक सरासरी 105 cm पर्यंत उंच वाढते आणि पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाऊ शकते.

मायको कंपनीचे लोकवन : हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या जातीच्या गव्हापासून खूपच उत्कृष्ट पुरणपोळ्या तयार केल्या जातात. यामुळे बाजारात या जातीच्या गव्हाला मोठी मागणी असते. या जातीच्या गव्हाला इतर जातीच्या गव्हापेक्षा अधिकचा भाव मिळतो. मात्र याचे बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध नाही. हा वाण शासनाकडून पेरणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे.

परंतु काही शेतकरी आजही या जातीच्या बियाण्याचे संवर्धन करून याचे उत्पादन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या जातीच्या विशेषताबाबत बोलायचं झालं तर या जातीचे पीक सरासरी 120 ते 130 दिवसात परिपक्व होते आणि या जातीपासून एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीसाठी चार ते पाचदा पाणी भरावे लागते या जातीच्या पिकाची उंची मध्यम असते आणि या वाणाची पेरणी ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत केली जाऊ शकते.

Leave a Comment