A Famous Hill Station In India : आपल्यापैकी अनेकांचे विदेशात फिरण्याचे स्वप्न असते. वर्षातून एकदा तरी फॉरेन ट्रिप काढावी असं अनेकांना वाटते. जर तुमचेही विदेशात फिरण्याचे स्वप्न असेल मात्र पैशाअभावी हे स्वप्न पूर्ण होत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की, आज आपण देशातील अशा एका सुंदर हिल स्टेशन बाबत माहिती जाणून घेणार आहोत जेथे तुम्ही भेट दिली तर कदाचित तुम्हाला परदेशातही जाण्याची हाव राहणार नाही. आज आपण स्कॉटलंड आणि स्वित्झर्लंडलाही मागे टाकेल अशा एका भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन बाबत जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या हिल स्टेशन बाबत बोलत आहोत ते आहे राजस्थान मधील माउंट अबू हे प्रसिद्ध हिल स्टेशन.
माउंट अबू हिल स्टेशन
खरंतर, राजस्थानला नैसर्गिक सौंदर्याची खाण लाभलेली आहे. येथे फिरण्यासारखी शेकडो ठिकाणे आहेत. अनेक हिल स्टेशन देखील आहेत. या हिल स्टेशनमध्ये मात्र पहिल्या क्रमांकावर येते ते माउंट अबू हे हिल स्टेशन. या हिल स्टेशनला नैसर्गिक सौंदर्याची खान म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
याला आपण पृथ्वीवरील स्वर्ग देखील म्हणू शकतो. या हिल स्टेशनला भेटी देण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी राजस्थानमध्ये येतात. जर तुम्हीही कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल, विशेषता हिवाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कुठे फिरायचं असेल तर तुम्ही माउंट अबुला एकदा नक्की भेट दिली पाहिजे. येथे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात भेट देऊन आपल्या ट्रिपचा परिपूर्ण आनंद घेऊ शकणार आहात.
माऊंट अबू हे हिल स्टेशन अरवली टेकड्यांनी झाकले गेले आहे. आजूबाजू उंच-उंच टेकड्या पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. येथे तुम्हाला धार्मिक वातावरण अनुभवायला मिळते. येथे नैसर्गिक सौंदर्य देखील सोबतीला असते. या ठिकाणी तुम्हाला अनेक एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीज करता येणार आहेत. यामुळे तुमची ट्रीप आणखी रंगतदार होणार आहे.
या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकणार आहात. ट्रेकिंग साठी इथे जवळपास 18 ट्रेकिंग पॉईंट आहेत. जर तुम्ही ट्रेकिंग करण्यास इच्छुक नसाल तर तुम्ही येथे जीप सफारीचा देखील आनंद घेऊ शकणार आहात. येथे तुम्ही रॉक क्लाइंबिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज करू शकता.
या ठिकाणी सूर्यास्त आणि सूर्योदयाचे देखील विहंगम दृश्य तुम्हाला पाहता येणार आहे. येथे अनेक धबधबे, तलाव, नद्या तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत, जर तुम्ही कुठे फिरायचा प्लॅन बनवत असाल तर माउंट आबू हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.