शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांना दिली 1500 कोटींची मदत! पण कोणत्या जिल्ह्याला किती निधी? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : चालू 2023 मधील मान्सून हंगामात मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे मात्र मान्सून अजूनही कमकुवतच आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2022 मध्ये मात्र परिस्थिती याउलट होती. गतवर्षी पावसाळी हंगामात जोरदार पाऊस झाला होता. जास्तीच्या पावसामुळे गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाले शिवाय सततच्या पावसामुळे देखील नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान निकषात बसत असल्याने त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली. मात्र सततच्या पावसामुळे झालेले नुकसान निकषात बसत नसल्याने याची नुकसान भरपाई मंजूर झालेली नव्हती.

यामुळे जवळपास 26 लाख शेतकरी बांधव नुकसान झालेले असतानाही नुकसान भरपाई पासून वंचित राहतील की काय अशी शक्यता तयार होत होती. मात्र या सततच्या पावसाने नुकसानग्रस्त 26 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

शिंदे सरकारने या सततच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य सरकारने गेल्या पावसाळ्यात नुकसान झालेल्या पंधरा लाख 57 हजार 971 हेक्टर क्षेत्रावरील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय गेल्या मंगळवारी अर्थातच 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता लवकरच हा निधी संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. दरम्यान आज आपण कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

जिल्हा शेतकरी संख्या निधी (लाखात)
अहमदनगर 29275124101.43
अकोला 1336568672.70
अमरावती 20312112957.36
छत्रपती संभाजी नगर 40144622698.11
बीड 43768819503.27
बुलढाणा 26832311490.29
जळगाव 628594514.73
जालना 21479313422.28
नागपूर 6161623.23
नाशिक 1127432583.36
धाराशिव 21601313707.58
परभणी 1885137037.32
सोलापूर 491684689.85
वाशीम 637163998.49

Leave a Comment