Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्या अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साईनगरी शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. खरतर साईनगरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात सध्या सणासुदीमुळे आनंदाचे आणि मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचा आनंद द्विगुणीत होईल असे चित्र तयार होत आहे. कारण की, पीएम मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर शिर्डीवासीयांसाठी काही विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तर काही नवीन विकास कामांचे भूमिपूजन देखील केले जाणार आहे. याशिवाय उद्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.
त्यामुळे या कार्यक्रमांकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे बारीक लक्ष आहे. दरम्यान, आता आपण पीएम मोदी नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्यासोबतच कोणकोणत्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत आणि कोणत्या विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नमो शेतकरीचा पहिला हप्ता देणार
खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली. हा निधी राज्य शासनाने कृषी विभागाकडे वर्ग केला आहे.
दरम्यान, या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या योजनेचा पहिला हप्ता हा उद्या अर्थातच 26 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील जवळपास 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी 1 हजार 712 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
रुग्णालयाचे भूमिपूजन होणार
याशिवाय, उद्या नरेंद्र मोदी साईनगरी शिर्डी येथील साई मंदिरातील दर्शन रांगेचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय काकडी परिसरात ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहात.
यावेळी निळवंडे धरणाचे लोकार्पण देखील होणार आहे. तसेच मोदी यांच्या हस्ते महिला व बाल रुग्णालयाचे भूमिपूजन देखील शिर्डी येथून ऑनलाईन केले जाणार आहे.