Success Story:- कोणतेही ध्येय साध्य करायचे असेल तर ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे नियोजन, प्रयत्नांमधील सातत्य, असलेल्या परिस्थितीशी दोन हात करत मार्ग काढण्याची क्षमता आणि काहीही झाले तरी ध्येय पूर्ण करणारच यासंबंधी असलेली इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. अशा प्रकारचे गुण जर व्यक्तीमध्ये असतील तर व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणे बघतो.

ज्यांनी बिकट अशा आर्थिक परिस्थितीवर मोठ्या कष्टाने आणि चिकाटी व सातत्य ठेवून मात केली व अनेक मोठमोठ्या पदांना गवसणी घातली. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर नगर शहरातील आदित्य वडवणीकर यांचे उदाहरण घेता येईल. आदित्य यांनी बिकट अशा आर्थिक परिस्थितीवर धैर्याने मात करून विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या लेखात आपण आदित्य यांची यशोगाथा बघणार आहोत.

Advertisement

बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत आदित्य वडवणीकर बनले विक्रीकर निरीक्षक
जर आपण साधारणपणे वडवणीकर कुटुंबाचा विचार केला तर ते बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या राजेगावचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय हातमागचा होता. परंतु 1965 यावर्षी त्यांचे संपूर्ण कुटुंब अहमदनगर येथे स्थलांतरित झाले व त्या ठिकाणीच स्थायिक झालेत. त्या ठिकाणी देखील त्यांचा हातमागाचा व्यवसाय सुरू होता. परंतु कालांतराने यामध्ये तंत्रज्ञान आले व प्रिंटिंगचे युग अवतरले.

त्यामुळे साहजिकच हातमाग व्यवसायावर वाईट दिवस आले. या कारणामुळे आदित्य वडवणीकर यांचे कुटुंब आर्थिक संकटामध्ये सापडले. बऱ्याच कुटुंबांमध्ये व्यसनाधीनता शिरली. परंतु आदित्य यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे त्या जोरावर कुटुंबाने धैर्याने या संकटाला तोंड दिले व हळूहळू त्यांच्या कुटुंबाची गाडी रुळावर आली. विशेष म्हणजे अशाही परिस्थितीत आदित्य यांचे वडील दत्ता वडवणीकर यांनी देखील पदवी पूर्ण केली व त्यांनी देखील नोकरीसाठी खूप प्रयत्न केले.

Advertisement

परंतु त्यांना नोकरी मात्र लागली नाही. त्यानंतर त्यांचे लग्न झाले व लग्नानंतर त्यांनी पत्नीला शिकवले.त्यांना त्यांच्या मित्रांची मदत झाली व त्यांच्या पत्नी आदिवासी विभागांमध्ये कामाठी म्हणून नोकरीवर रुजू झाल्या. इकडे आदित्य यांचे वडील जे काम मिळेल ते करत होते व कुटुंबाचा गाडा हाकत राहिले. त्यानंतर त्यांनी एक जुनी रिक्षा खरेदी केली व रिक्षा व्यवसायामध्ये ते पडले. या कालावधीत रिक्षाचा व्यवसाय चांगल्यापैकी आर्थिक आधार देऊ लागला व त्यांच्या पत्नीला देखील चांगला रोजगार मिळाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जवळजवळ मिटला.

आदित्यने अशाप्रकारे शिक्षण केले पूर्ण
आदित्य वळवणीकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावेडीतील गाडीलकर विद्यालयामध्ये झाले व अकरावी बारावी करिता त्यांनी रेसिडेन्शियल हायस्कूल ला ऍडमिशन घेतले. सायन्स मधून त्यांनी पदवीचे शिक्षण न्यू आर्ट्स महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर मात्र ते स्पर्धा परीक्षांकडे वळले व त्याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यावे याकरिता त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व या ठिकाणहून त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये एमएसस्सी पूर्ण केली.

Advertisement

त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चांगला करता यावा याकरिता पुणे शहर गाठले व या ठिकाणी एक रूम घेऊन या रूमवर अभ्यासाला सुरुवात केली. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोविडने धुमाकूळ घातला व आदित्य यांना घरी अहमदनगर येथे यावे लागले. परंतु नगर या ठिकाणी आल्यानंतर देखील स्वस्थ न बसता आदित्य यांनी रहमत सुलतान सभागृहामध्ये दररोज बसून अभ्यास केला.

या अभ्यासाच्या जोरावर आदित्य यांची जानेवारी 2023 रोजी पुणे महापालिकेमध्ये लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झाली व या पदावर ते रुजू झाले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये मात्र आदित्य वडवणीकर यांनी थेट विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. यावरून आपल्याला दिसून येते की जर व्यक्तीमध्ये जिद्द असेल तर आर्थिक परिस्थिती कशीही राहिली तरी व्यक्ती त्या परिस्थितीवर मात करत दैदीप्यमान यश मिळवू शकतो.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *