Ahmednagar Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड पाहायला मिळते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. ऊस खरंतर एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच बागायती भागात मोठ्या प्रमाणात शेती होते.
उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी भागात उसाची शेती पाहायला मिळते. ऊस लागवडीत महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. साखर उत्पादनातही महाराष्ट्र राज्याचे मोलाचे योगदान आहे.
साखर उत्पादनात अहमदनगर जिल्ह्याचा देखील मोठा खारीचा वाटा आहे. दरम्यान जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील साखर उद्योगातील एका मोठ्या ग्रुपने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
ओंकार ग्रुपने जिल्ह्यातील उसाला एक नंबरचा भाव देणार असल्याचा दावा केला आहे. ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी जिल्ह्यातील उसाला एक नंबरचा भाव देणार असल्याची माहिती दिली आहे. हिरडगाव येथील गौरी शुगर या साखर कारखान्याच्या रोलर पूजन समारंभ नुकताच पार पडला.
या साखर कारखान्याचा हा पहिलाच हंगाम आहे. या गौरी शुगर साखर कारखान्याच्या रोलर पूजन समारंभावेळी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी ही माहिती दिली आहे. रोलर पूजन समारंभ एक सप्टेंबरला बाबुराव बोत्रे व रेखा बोत्रे यांच्या हस्ते पार पडले.
तसेच यावेळी 240 के पी एल डी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हे भूमिपूजन प्रशांत बोत्रे व शारदा बोत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी बाबुराव बोत्रे यांनी केवळ साखर निर्मिती करून उसाला चांगला भाव देता येणार नाही.
यामुळे व्यवसाय व व्यवहार डोळ्यासमोर ठेवून कारखान्यात डिस्टिलरी क्षमता 240 केपीएलडीने वाढवली जाणार आहे. यामुळे दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. तसेच 24 टी पी एच क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प उभारला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याव्यतिरिक्त प्रेमसडपासून दररोज 400 मेट्रिक टन पोटॅश तयार केले जाणार असून याचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आणि याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत येत्या सहा महिन्यात केले जाईल असे देखील बोत्रे यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान गौरी शुगर हा साखर कारखाना यंदाच्या हंगामापासून गाळप सुरू करणार आहे. या साखर कारखान्याचे गाळप 15 ऑक्टोबर पासून सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. निश्चितच, ओंकार ग्रुप अंतर्गत येणाऱ्या सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाला जर चांगला भाव मिळाला तर संबंधितांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.