आनंदाच्या शिधाबाबत आनंदाची बातमी ! आता 100 रुपयात 4 नाही तर 6 वस्तू मिळणार, कोणत्या वस्तूंचा झाला समावेश ? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anandacha Shidha Latest News : महाराष्ट्रातील नागरीकांसाठी सणासुदीच्या काळात एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार आहे. काल अर्थातच 3 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. खरंतर, गौरी-गणपती आणि दिवाळी सणाला आनंदाचा शिधा देण्याचे शिंदे सरकारने आधीच जाहीर केले होते. यानुसार गौरी गणपतीच्या सणाला आनंदाचा शिधा वितरित देखील झाला.

दरम्यान आता काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीच्या सणाला आनंदाचा शिधा देण्याबाबत निर्णय झाला. म्हणजे आता दिवाळीच्या सणाला देखील आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान या दिवाळीत दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे आता नागरिकांना शंभर रुपयात चार नाही तर सहा जिन्नस मिळणार आहेत. आतापर्यंत वितरित झालेल्या आनंदाच्या शिधात शासनाकडून चार जिन्नसा दिल्या जात होत्या. पण आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता शंभर रुपयात सर्वसामान्य नागरिकांना रवा, चनाडाळ, साखर, खाद्यतेल यासोबतच मैदा आणि पोहे देखील दिले जाणार आहे.

यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना सणासुदीच्या दिवसात मोठ्या दिलासा मिळणार आहे. यामुळे राज्यातील गरीब शिधापत्रिका धारकांचा सण गोड होणार यात शंकाच नाही.  मिळालेल्या माहितीनुसार, आंनदाचा शिधा या संचात १ किलो साखर, १ लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चासदेखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आगामी काही दिवसात हा आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना वितरित केला जाणार आहे.

Leave a Comment