मयत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढणे कायदेशीर आहे का ? नियम काय सांगतात ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Card Rules : तुम्हीही एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढता ना ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर अलीकडे सर्वत्र यूपीआयने पेमेंट केले जात आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या एप्लीकेशनचा वापर करून आता पेमेंट केले जात आहे.

मात्र असे असले तरी आजही अनेकजण कॅशने पेमेंट करतात. यासाठी बँकेतून पैसे काढले जातात. बँकेतून पैसे काढण्यासाठी अनेकजण एटीएम कार्डचा वापर करतात.

एटीएम कार्डमुळे पैसे काढणे सोयीचे झाले आहे. कोणत्याही एटीएममधून ग्राहकांना एटीएम कार्डचा उपयोग करून पैसे काढता येतात.

मात्र अनेकांच्या माध्यमातून मयत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या खात्यातून पैसे काढले तर हे कायदेशीर आहे का ? याबाबतचे नियम काय सांगतात असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून जर दुसऱ्या व्यक्तीने पैसे काढले तर काय होते, किंवा हे कायदेशीर आहे का ? जर मृत व्यक्तीच्या खात्यातून त्याच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीने एटीएम कार्डने पैसे काढलेत तर ते कायदेशीर आहे का ? याविषयी काय नियम आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डने दुसऱ्याने पैसे काढलेत तर

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीच्या एटीएम कार्ड मधून दुसऱ्याने पैसे काढणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले तरीदेखील हे कायदेशीर समजले जाणार नाही.

जर बँकेला याबाबतची माहिती मिळाली तर बँकेकडून अशा प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकते. यामुळे कोणीही मयत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढू नये अन्यथा अशा व्यक्तींवर कारवाई होऊ शकते.

मयत व्यक्तीच्या खात्यातून पैसे कसे काढता येणार?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर मयत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून दुसऱ्याला पैसे काढता येत नाहीत मग मयत व्यक्तीच्या खात्यात असणारी रक्कम त्याच्या कुटुंबाला कशी मिळणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे.

मयत व्यक्तीने ज्याला नॉमिनी म्हणून नियुक्त केलेले असेल त्या व्यक्तीला बँकेत जाऊन एक फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. बँकेला मयत व्यक्तीचे निधन झाले आहे असे कळवावे लागेल आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे आहेत असे सांगावे लागेल.

तसेच मृत व्यक्तीचा मयत दाखला, मृत व्यक्तीचे पासबुक, खात्याचे टीडीआर, तसेच नॉमिनीला त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि पडताळणी नंतर बँक नॉमिनीला पैसे काढण्याची मुभा देते.

Leave a Comment