भारतीय हवामान विभाग : गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील ‘या’ 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : आज गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाभिनंदन !! यामुळे संपूर्ण राज्यात मोठे आनंदाचे वातावरण आहे. आज पासून मराठी नववर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र मराठी नूतन वर्षाभिनंदनाच्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सूर्य जणू आग ओकत आहे. महाराष्ट्रावर सूर्यदेव मोठ्या प्रमाणात कोपला असून मागे अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

अशातच मात्र आता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल-परवा राज्यातील काही भागात वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मात्र पावसाचे हे सत्र शुक्रवार पर्यंत कायम राहू शकते असा एक अंदाज आहे.

दरम्यान आज हवामान खात्याने राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपासून रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत असून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज राज्यातील विदर्भ अन मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पण, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ उतार होत राहणार असा अंदाज आहे. आता आपण भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील कोणत्या 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस

आज गुढीपाडव्याला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. या विभागातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. 

Leave a Comment