एसबीआय, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा मध्ये 3 वर्षाच्या कालावधीसाठी एक लाख रुपयांची एफडी केल्यास किती रिटर्न मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD News : एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग थांबा आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा पर्याय खूपच फायदेशीर ठरू लागला आहे. येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे.

शिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये एफडीच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता एफडी करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ लागले आहे. परिणामी अनेकजण आता एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवत आहेत.

विशेष म्हणजे तज्ञ लोकांनी अगदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये महिला गुंतवणूकदार देखील आता मोठ्या प्रमाणात एफडी करण्यास पसंती दाखवत आहे.

दरम्यान आज आपण एसबीआय एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या बँकेत तीन वर्षांच्या कालावधीसाठी एक लाख रुपयांची एफडी केली तर किती रिटर्न मिळणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच आज आपण या बँकेचे एफ डी व्याजदर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात एकूण बारा सरकारी बँका आहेत. यातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयचा गौरव होतो. ही बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते.

या बँकेकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याजदर दिले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तीन वर्षांच्या एफडी साठी बँकेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना 7.25% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

म्हणजेच या बँकेत जर ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी आता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना तीन वर्षांनी एक लाख 24 हजार रुपये एवढा परतावा मिळणार आहे. अर्थातच त्यांना या कालावधीत 24 हजार रुपये एवढे व्याज मिळणार आहे.

एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही देखील देशातील एक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी साठी जेष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. अर्थातच जर एखाद्या गुंतवणूकदाराने आता एक लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटीवर एक लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत.

बँक ऑफ बडोदा : देना बँकेचे बँक ऑफ बडोदा मध्ये मर्जर झाले. यानंतर बँकेची ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक म्हणून उदयास आली आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज देत आहे.

या बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी साठी 7.75 टक्के एवढ व्याज दिले जात आहे. यामुळे ही बँक FD साठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देणारी बँक बनली आहे. जर या बँकेत तीन वर्षांच्या एफडीमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी वर एक लाख 26 हजार रुपये मिळतात.

Leave a Comment