एसबीआयकडून 10 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? पहा संपूर्ण फायनान्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Car Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. दरम्यान बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये, गृह कर्ज, सुवर्ण कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा विविध कर्जांचा समावेश होतो.

दरम्यान जर तुम्ही एसबीआयकडून कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष खास राहणार आहे.

जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल मात्र तुमच्याकडे भांडवल नसेल तर टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला ऑटो लोन घेऊन देखील तुमच्या कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे असतील तर तुम्ही तेवढे पैसे भरून उर्वरित पैशांसाठी ऑटो लोन घेऊ शकता.

एसबीआय बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात ऑटो लोन देते. दरम्यान आता आपण एसबीआय बँकेच्या ऑटो लोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कार लोनसाठी एसबीआय किती व्याज आकारते

मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोन साठी 8.85% एवढे व्याजदर आकारते. मात्र हा व्याजदर अशा व्यक्तींना लागू राहील ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे. म्हणजे जर सिबिल स्कोर यापेक्षा कमी असेल तर कर्जाचा व्याजदर वाढणार आहे.

10 लाखाचे कार लोन घेतले तर

एसबीआयकडून जर 8.85% एवढ्या किमान व्याजदरात मी पाच वर्ष परतफेड कालावधीसाठी दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर 20,686 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

या कालावधीत तुम्हाला दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी बारा लाख 41 हजार 138 रुपये फेडावे लागणार आहेत. म्हणजेच दोन लाख 41 हजार 138 रुपये तुम्हाला व्याज भरायचे आहे.

Leave a Comment