आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणेबाबत अधिकृत शासन निर्णय जारी, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष कामाची राहणार आहे. खरंतर, महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ व्हावी यासाठी मागणी केली जात आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अ, ब आणि क च वर्गातील राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे एवढे आहे.

दुसरीकडे ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वय हे साठ वर्षे एवढे आहे. एवढेच नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आणि देशातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे देखील 60 वर्षे एवढे आहे.

अशा परिस्थितीत, राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

यासाठी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला जात आहे. विशेष म्हणजे शासन देखील याबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करणे बाबतचा प्रस्ताव सध्या राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच, मात्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्यात आले नाही.

जस की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने कृषी विभागांतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक अधिष्ठाता आणि संचालक दर्जामधील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्यात आला आहे.

या संबंधित शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे एवढे होते. मात्र यामध्ये दोन वर्षांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे झाले आहे.

याबाबत काल अर्थातच 20 फेब्रुवारी 2024 ला कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अधिकृतरित्या 62 वर्षांवरून 60 वर्षे झाले आहे.

Leave a Comment