Banking News : आपल्यापैकी प्रत्येकाचे बँकेत किमान एक तरी खाते असेलच. विशेष म्हणजे काही लोकांचे एकापेक्षा अधिक खाते असतात. पैशांचे व्यवहार अधिक असल्याने अनेक लोक एकापेक्षा अधिक बँक अकाउंट ओपन करतात.
मात्र कित्येकदा असे आढळून आले आहे की ज्या लोकांचे अधिक बँक अकाउंट असतात ते लोक आपल्या काही बँक अकाउंटमधून पैशांचे कुठलेच व्यवहार करत नाहीत.
जर तुम्हीही तुमच्या बँक अकाउंट मधून पैशांचा कुठलाच व्यवहार करत नसाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.
कारण की, आज आपण एखाद्या बँक अकाउंटमधून किती दिवस पैशांचे व्यवहार झाले नाहीत तर सदर बँक अकाउंट बंद होऊ शकतं याबाबत आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोणती माहिती समोर आली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इतके दिवस पैशांचे व्यवहार झाले नाहीत तर बँक अकाउंट होणार बंद
आरबीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार जर एखाद्या बँक अकाउंट मध्ये सदर खातेधारकाने काही कारणास्तव दोन वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवहार केलेले नसेल तर असे खाते बँकेद्वारे निष्क्रिय केले जात असते.
एखाद्या व्यक्तीचे बँक खाते निष्क्रिय झाले की अशा खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत. मात्र हे खाते पूर्णपणे बंद होते असे नाही कारण की निष्क्रिय खाते पुन्हा एकदा सक्रिय केले जाऊ शकते.
निष्क्रिय खात्यात कोणतीही रक्कम जमा केली तर ती तशीच राहील आणि कालांतराने बँक त्यावर नियमित व्याज देत राहील.
निष्क्रिय खाते नियमित कसे करावे ?
कोणतेही निष्क्रिय खाते सहजपणे नियमित खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन KYC करून घ्यावे लागेल आणि त्यासाठी पॅन, आधार यासारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील.
तुमचे संयुक्त खाते असल्यास दोन्ही खातेधारकांना केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील. विशेष बाब अशी की, निष्क्रिय खाते पुन्हा एकदा नियमित करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क बँकांच्या माध्यमातून वसूल केले जाऊ शकत नाही.
एवढेच नाही जर तुमच्या निष्क्रिय बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी रक्कम असेल तरीदेखील बँका तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाहीत. RBI ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी याबाबतचे सक्त निर्देश बँकांना जारी केलेले आहेत.