पंजाब डख यांचा मोठा दावा ! 10 जानेवारीनंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार; पण ‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : जेष्ठ हवामान अभ्यासक, परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानाबाबत नुकताच एक नवीन अंदाज सार्वजनिक केला आहे. या अंदाजात पंजाबरावांनी राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान आणखी किती दिवस कायम राहणार, यानंतर कसे हवामान राहणार, तसेच पुन्हा अवकाळी पावसाला केव्हा सुरुवात होणार याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

खरंतर डख यांच्या हवामान अंदाजावर राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधव डख यांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान पंजाबरावांनी 5 जानेवारी 2024 ला एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.

यामध्ये पंजाब रावांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार, किती दिवस असेच ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण कायम राहणार याबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट दिले आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात 10 जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाचे हे सत्र सुरू राहणार आहे. आज पासून आगामी तीन दिवस राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कर्नाटक उत्तर महाराष्ट्र या भागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

या काळात नागपूर, वर्धा, अकोला, वासिम, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, बार्शी, जत, कर्नाटक, पुणे या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. फार मोठा पाऊस पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे डख यांनी सांगितले आहे.

मात्र पुढील तीन दिवस राज्यातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, येरमाळा, उस्मानाबाद, अहमदनगर, पाथर्डी, माजलगाव, लातूर, शेलु, उदगीर, परभणी, नांदेड, जिंतूर, रिसोड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि अकोट या भागातील काही ठिकाणी थोडा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, जमिनीची पेंडओल होईल एवढा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. मात्र 10 जानेवारी नंतर हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

त्यानंतर जवळपास दीड महिना हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे. पण डख यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 22 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या कालावधीत अवकाळी पावसाची तीव्रता ही आत्तापेक्षा अधिक राहील असा अंदाज आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची थोडीशी डोकेदुखी वाढू शकते यात शंकाच नाही. 

Leave a Comment