आरबीआयची धडक कारवाई ! ‘या’ बँकेतून आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, बँक बंद होणार का ? खातेदारांची चिंता वाढली, पहा……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने देशातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.

खरंतर ज्या बँका आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमांचे पालन करत नाहीत, रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकेसाठी घालून देण्यात आलेले निकषांचे पालन करत नाहीत अशा बँकांवर कारवाई केली जाते. आरबीआयच्या निकषांची पूर्तता केली नाही तर बँकेचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने राजधानी मुंबई स्थित दि कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेचा परवाना रद्द केला आहे. अशातच आताच आता रिझर्व बँकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय ने आता कलर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेची आर्थिक स्थिती, पुरेसे भांडवल आणि कमाई होण्याची शक्यता नसल्याने या बँकेसाठी काही निर्बंध लावले आहेत.

त्यानुसार आता या बँकेतील ग्राहकांना 50,000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बँक नवीन कर्ज देऊ शकत नाही. तसेच जुन कर्ज रिन्यू करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे बँकेत नवीन गुंतवणूकही करता येणार नाहीये. हे निर्बंध 26 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे आगामी सहा महिने हे निर्बन्ध कायम राहणार अशी माहिती समोर आली आहे.

यामुळे सहाजिकच या बँकेतील ग्राहकांना काही काळ मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ही बँक बंद पडते की काय अशी देखील भीती आता या बँकेतील ग्राहकांना वाटू लागली आहे.

पण आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. फक्त जोपर्यंत सदर बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत ही बंदी राहणार असे नमूद केले आहे. 

Leave a Comment