महाराष्ट्रातील ‘या’ बड्या बँकेवर रिझर्व बँकेची मोठी कारवाई ! आता ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई महाराष्ट्रातील एका बड्या बँकेवर झाली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेतील ग्राहकांना खात्यामधून पैसे काढता येणार नाहीयेत. दरम्यान आरबीआयने केलेल्या या कठोर कारवाईमुळे सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे काही बँकेचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतलेला आहे. दरम्यान, बँकेने नुकतीच राज्यातील शिरपूर येथील शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

यानुसार, आता सदर बँकेतील ग्राहकांना खात्यांमधून पैसेही काढता येणार नाहीयेत. आरबीआयने अर्थातच 8 एप्रिल 2024 रोजी ही कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने खात्यातून पैसे काढण्यासह बँकेच्या अनेक सेवा बंद केल्या आहेत.

सदर बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासाळत असल्याने मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सदर बँकेतील सेविंग अकाउंट तसेच करंट अकाउंट किंवा इतर कोणत्याही खात्यामध्ये असणाऱ्या एकूण रकमेमधून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी ग्राहकांना दिली जाणार नाही.

मात्र बँक ग्राहक त्यांच्या खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेमधून कर्जाची परतफेड करू शकणार आहेत. यासाठी देखील रिझर्व बँकेने काही अटी आणि शर्ती लावून दिल्या आहेत. विशेष म्हणजे आता या बँकेला कोणतेही नवीन कर्ज देता येणार नाही.

तसेच ही बँक आता कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. एवढेच नाही तर या सदर बँकेला आता आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय तिची मालमत्ता हस्तांतरित करण्याची परवानगी देखील राहणार नाही.

या बँकेतील ग्राहक डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकणार आहेत. म्हणजेच सदर बँकेतील ग्राहकांना त्यांच्या जमा रकमेपैकी पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे.

दरम्यान या बँकेवर लावलेले हे निर्बंध पुढील सहा महिन्यापर्यंत कायम राहणार आहेत. परंतु या निर्बंधामुळे बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे असे नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत या निर्बंधासह बँक बँकिंग व्यवसाय सुरू ठेवू शकणार आहे.

त्यामुळे खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र ही कारवाई बँकेची आर्थिक स्थिती खालावली असल्याने करण्यात आली आहे. ही कारवाई ग्राहकांचे नुकसान होईल म्हणून झालेली नाही.

तथापि, आरबीआयच्या या कारवाईमुळे ग्राहक थोडेसे  बिथरले आहेत. यामुळे आता येत्या सहा महिन्यांनी आरबीआय याबाबत काय निर्णय घेते याकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहणार आहे. 

Leave a Comment