राज्य कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची मोठी भेट, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त 10 हजार 500 रुपयांचा लाभ ! कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडवा तथा मराठी नूतन वर्षाभिनंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. चैत्र मासाचा हा पहिलाच दिवस. दरम्यान राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची मोठी भेट मिळाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

दरम्यान, आता आपण राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त वेतनाचा लाभ ?

जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गरम आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्यातील मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.

ज्यांची कुणबी नोंद नाही अशा मराठी बांधवांना हे दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे. या आरक्षणाच्या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात सर्वेक्षण केले होते.

या सर्वेक्षणाच्या कामकाजाची जबाबदारी राज्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण हे कामकाज सदर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामकाज असल्याने यासाठी अतिरिक्त मानधन मिळायला पाहिजे अशी मागणी होती.

विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सदर कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही दिली होती.

यानुसार आता या संबंधित कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे परिपत्रक मात्र दोन एप्रिललाच निर्गमित झाले आहे.

या शासन परिपत्रकानुसार, प्रति पर्यवेक्षक रुपये 10,500/- रुपये तर प्रति प्रशिक्षक रुपये 10,000/- इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.तसेच, सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांना अदा करण्यात आलेले आहेत.

म्हणजे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या बँक खात्यात शासनाकडून अतिरिक्त वेतनाचा पैसा प्राप्त झाला आहे. आता हा निधी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. यामुळे सदरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.

Leave a Comment