गुढीपाडव्याला सर्वसामान्यांना दिलासा !! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात ? आजचे नवीन रेट चेक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol And Diesel Rate Check : गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना गुढीपाडव्याच्या पावन पर्वापूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर पेट्रोल आणि डिझेल जीवनावश्यक बनले आहे. पण इंधनाचे दर गेल्या काही वर्षांपासून चांगलेच कडाडले आहेत. इंधनाच्या दरासमवेतच महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या महागाईचा आलेख मात्र सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत असून यामुळे खिशाला मोठी कात्री बसत आहे. पण मराठी नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईच्या मोर्चावर दिलासा मिळालाय. 14 मार्च 2024 ला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज जाहीर केल्या जातात. यांनुसार आज या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला पाहायला मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ होत आहे.

क्रूड $90 च्या वर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येतो. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत यादी जाहीर करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 9 एप्रिलसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

9 एप्रिलला म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि आजही तेलाचे दर जैसे थेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी 14 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. पेट्रोलच्या दरात 2 रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांपर्यंत कपात केली आहे. मात्र, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर 94.72 प्रति लिटर आणि डिझेलचे दर 87.62 रुपये प्रति लिटर असे नमूद करण्यात आले आहेत.

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 92.15 रुपये प्रति लिटर एवढे नमूद करण्यात आले आहेत.

कोलकत्ता : येथे आज पेट्रोलचे दर 103.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 90.76 रुपये प्रति लिटर असे नमूद करण्यात आले आहेत.

चेन्नई : चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 92.32 रुपये प्रति लिटर असे नमूद करण्यात आले आहेत.

बेंगळुरू : बेंगलोर मध्ये आज पेट्रोल दर 99.84 प्रति लिटर आणि डिझेलचे दर 86.93 रुपये प्रति लिटर असे नमूद करण्यात आले आहेत.

लखनऊ : लखनऊमध्ये आज पेट्रोलचे दर 94.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 87.76 रुपये प्रति लिटर असे नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Comment