Banking News : आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे बँक अकाउंट असेल. ग्राहक आपल्या गरजेनुसार बँकेत विविध प्रकारचे अकाउंट ओपन करतात. कोणी करंट अकाउंट ओपन करत, कोणी सॅलरी अकाउंट ओपन करत तर कोणी सेविंग अकाउंट ओपन करत. सर्वसाधारणपणे सर्वसामान्य नागरिक बँकेत सेविंग अकाउंट ओपन करत असतात.
दरम्यान आपण सर्वजण आपल्या खात्यात आपल्याकडील असलेली मोठी रक्कम जमा करत असतो. बँकेत आपले पैसे सुरक्षित असतात त्यामुळे आपण घराच्या तिजोरीत पैसे ठेवण्याऐवजी बँकेत पैसे जमा करतो.
आपल्याला वाटते की बँकेतील पैसे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे आपल्यापैकी काही जण गुंतवणुकीसाठी बँकेत एफडी देखील करतात. एफ डी वर बँक ग्राहकांना चांगले व्याज मिळते. मात्र असे असले तरी अनेकदा बँक बुडते.
अशावेळी ग्राहकांचे पैसे देखील बुडतात. बँक बुडाल्यानंतर ग्राहकांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते. पण एखाद्या ग्राहकाचे बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे असतील तर त्याला फक्त पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते.
पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे सदर बुडलेल्या बँकेत जमा असल्यास ते पैसे देखील बुडतात. अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ? हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, ग्राहकांच्या याच प्रश्नाचे उत्तर स्वतः आरबीआयने दिले आहे. आरबीआयने देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांविषयी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टरमधील बँक आहे आणि दोन बँका प्रायव्हेट सेक्टर मधील आहेत.
देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ?
अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँकांच्या (D-SIB) श्रेणीमध्ये देशातील तीन बँकांचा समावेश केला आहे. श्रेणीमध्ये देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या तीन बँकेचा समावेश होतो. यातील एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे तर उर्वरित दोन बँका प्रायव्हेट सेक्टर मधील आहेत.
या तिन्ही बँक देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाच्या बँकिंग संस्था आहेत. यामुळे या बँकांना या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. बँक एम्प्लॉईज नॅशनल ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा अश्विनी राणा म्हणतात की, या बँकांचा मालमत्तेचा आधार इतका मजबूत आहे की, ते कोणताही आर्थिक भार सहन करू शकतात.
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असण्याव्यतिरिक्त, या बँकांकडे कर्जापेक्षा जास्त मालमत्ता आहे. साहजिकच या बँका कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाहीत. कारण की त्यांचे कर्ज बुडले तरी त्यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही.
या बँकांचा एनपीएही झपाट्याने कमी होत असून बहुतांश गुंतवणूक सुरक्षित पर्यायांमध्ये करण्यात आली आहे. या कारणास्तव या 3 बँकांचे ताळेबंद जोरदार मजबूत आहे. त्यामुळे या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जात आहेत.